Homeताज्या बातम्याअहमदनगर

संगमनेर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड मीनल देशमुख तर उपाध्यक्षपदी ॲड किरण रोहम यांची निवड

संगमनेर तालुका बार असोसिएशन (वकील संघटना) अध्यक्षपदी ॲड मीनल गुलाबराव देशमुख या 151 मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या असून उपाध्यक्षपदी ॲड किरण

संगमनेर तालुक्याला भंडारदरा-निळवंडेचे पाणी द्याशेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ; शेतीसाठी 11 तास दिवसा वीज देण्याची मागणी
महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक
आधुनिक शेडनेट शेतीतून आर्थिक प्रगती : माजी मंत्री थोरात 



संगमनेर तालुका बार असोसिएशन (वकील संघटना) अध्यक्षपदी ॲड मीनल गुलाबराव देशमुख या 151 मतांच्या मोठ्या फरकाने विजयी झाल्या असून उपाध्यक्षपदी ॲड किरण सुधाकर रोहम यांची निवड झाली आहे.संगमनेर तालुका बार असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये ॲड मीनल देशमुख- कोते यांना 255 मते मिळाली विरोधी उमेदवार जनार्दन वाळूज यांचा त्यांनी 151 मतांनी पराजय केला तर उपाध्यक्षपदी ॲड किरण सुधाकर रोहम यांची निवड झाली. महिला उपाध्यक्षपदी ॲड वंदना दत्तू दिघे वाबळे, सचिव पदी ॲड अमोल कारभारी घुले, सहसचिव म्हणून ॲड सुशांत सोमनाथ वाळे, खजिनदार ॲड बबनराव गणपत नाईकवाडी, तर सदस्य पदी ॲड अरुण गायकवाड , ॲड मेघाताई तापडिया, ॲड सना पठाण, ॲड ऋषिकेश वाणी , ॲड प्रतीक दातीर यांची निवड झाली आहे.नवीन पदाधिकाऱ्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते तथा संगमनेर वकील संघटनेचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, ॲड सुहास आहेर, ॲड प्रदीप मालपाणी, यांच्यासह वकील संघटनेच्या सर्व आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS