महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक

नेवासा फाटा (प्रतिनिधी) -  तळागाळातील गरीब सामान्य माणूस प्रामाणिकपणे व निष्ठेने काँग्रेसचे काम करत असतो, काँग्रेसला बळ देण्याचे काम कायम गरीब

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला बिगर खात्याचे मंत्री झेंडावंदनाला जाणार
सेवानिवृत्तीनंतरही एका कुटुंबाप्रमाणे सुखदुःखात सहभाग – थोरात
विरोधी पक्षनेते पदावर काँगे्रसचा दावा

नेवासा फाटा (प्रतिनिधी) – 

तळागाळातील गरीब सामान्य माणूस प्रामाणिकपणे व निष्ठेने काँग्रेसचे काम करत असतो, काँग्रेसला बळ देण्याचे काम कायम गरीब माणसाने केले आहे म्हणून गरीब माणूसच खऱ्या अर्थाने काँग्रेसचा कना राहिला आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेते व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतेच केले.

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अहमदनगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाची महत्वपूर्ण बैठक नुकतीच जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांच्या नेवासा फाटा येथील निवासस्थानी संपन्न झाली.

यावेळी आमदार लहू कानडे यांनी आपल्या भाषणात संविधानातील अनेक मूल्य समजून सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघमारे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रदेश समन्वयक बंटीभाऊ यादव यांनी केले. यावेळी ज्ञानदेव वाफारे, शिवाजीराव जगताप, कार्लस साठे, संजय भोसले, नामदेवराव चांदणे, प्रकाश तुजारे आदींची भाषणे झाली,

कार्यक्रमास मुळा सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन कडूबाळ कर्डिले, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब साळुंके, अहमदनगर जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापराव शेळके, जिल्हा समन्वयक ज्ञानदेवजी वाफारे, प्रदेश समन्वयक बंटी भाऊ यादव, प्रदेश समन्वयक शिवाजीराव जगताप, जिल्हा उपाध्यक्ष कार्लस साठे, प्रदेश समन्वयक संजय भोसले, समन्वय नामदेवराव चांदणे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव तोरणे, कार्याध्यक्ष कमलेश गायकवाड, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सविता विधाते, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश तुजारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किशोर भणगे, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ज्ञानेश्वर (माऊली) मुरकुटे, जिल्हा सरचिटणीस सुदामराव कदम, नेवासा शहराध्यक्ष रंजन दादा जाधव, नगर तालुका कार्याध्यक्ष सतीश बोरुडे, विजय पाथरे, प्रसाद भाऊ पटारे, जिल्हा काँग्रेस संघटक बाबासाहेब कोळसे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष अरुण पाटील नाईक, सुरेशनगरचे सरपंच पांडुरंग पाटील उभेदळ, हंडीनिमगावचे सरपंच अण्णासाहेब जावळे, वडुले गावचे सरपंच दिनकरराव गर्जे, भिवाजीराव आघाव, संतोषभाऊ उंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बाप्पू भोसले, कोपरगाव तालुका सेवादलाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर भगत, जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र ब्राह्मणे, पाथर्डी तालुका अध्यक्ष गणेश दिनकर, नगर तालुका अध्यक्ष गणेश ढोबळे, शेवगाव तालुका अध्यक्ष कचरू मगर, कोपरगाव तालुका अध्यक्ष चंद्रकांत बागुल, कोपरगाव शहराध्यक्ष रवींद्र साबळे, नेवासा सोशल मीडिया प्रमुख सचिन बोर्डे, मुन्ना चक्रनारायण, श्रीरामपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष नितीन काळे, उपाध्यक्ष राजू चक्रनारायण, बंटी जाधव, वैभव वाघमारे, कला व सांस्कृतिक विभागाचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर कडू, जिल्हा सेवादलाचे सेक्रेटरी समीर काझी, मक्तापूरचे माजी सरपंच रामकृष्ण कांगुणे, हंडीनिमगाव ग्रा.प. सदस्य नितीन कांबळे, अविनाश कांबळे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शेवगाव येथील युवक कार्यकर्ते एकनाथ कोल्हे व इतर युवक कार्यकर्त्यांनी कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.

 यावेळी प्रदेश समन्वयक शिवाजीराव जगताप यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.

COMMENTS