Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोकुंदा येथील सरतापे कुटुंबाची ’यशाची हॅट्ट्रिक’; सुमेध, श्वेता आणि अंकिताची गरुडझेप!

किनवट : जिद्द, चिकाटी आणि पालकांचे खंबीर पाठबळ असेल तर यश हमखास मिळते, हे गोकुंदा (ता. किनवट) येथील सरतापे कुटुंबातील मुलांनी सिद्ध करू

आदिवासींच्या 19 माध्यमिक शाळांची श्रेणीवाढ; सोलापुरला नवीन शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीड येथे प्रवेश पूर्व मार्गदर्शन केंद्र सुरू
तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईनमध्ये ‘नारी शक्ती कौशल्य अभियान’ संपन्न;महिलांच्या घटनात्मक अधिकार व करिअर संधींबाबत विद्यार्थिनींमध्ये जागरूकता

किनवट : जिद्द, चिकाटी आणि पालकांचे खंबीर पाठबळ असेल तर यश हमखास मिळते, हे गोकुंदा (ता. किनवट) येथील सरतापे कुटुंबातील मुलांनी सिद्ध करून दाखवले आहे. प्राचार्य आनंद सरतापे यांच्या तिन्ही मुलांनी स्पर्धा परीक्षा आणि वैद्यकीय क्षेत्रात दैदिप्यमान यश संपादन करत परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सरतापे परिवारातील सुपुत्र सुमेध आनंद सरतापे याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे. त्याची निवड ’सहाय्यक कर अधिकारी’ या पदावर झाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीच त्याची नियुक्ती पोलीस महासंचालक कार्यालय परिक्षेत्र, नांदेड येथे महसुली लिपिक म्हणून झाली होती. मात्र, आपले ध्येय मोठे ठेवून त्याने हे दुहेरी यश मिळवले. केवळ सुमेधच नव्हे, तर त्याच्या भगिनींनीही यशाची परंपरा कायम राखली आहे: श्वेता आनंद सरतापे: हिची ’एम.पी.एस.सी’.  परीक्षेद्वारे ’कृषी सहाय्यक अधिकारी’ म्हणून निवड झाली असून, सध्या ती नागपूर विभागात कार्यरत आहे. अंकिता आनंद सरतापे: हिने ’नीट’ परीक्षेत सुयश मिळवून नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस साठी प्रवेश मिळवला आहे. किनवट येथील सरस्वती अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य आनंद सरतापे आणि मनीषा आनंद सरतापे यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने परिश्रम घेतले. आपल्या मुलांनी उच्चशिक्षित होऊन समाजाची सेवा करावी, हे त्यांचे स्वप्न आज सत्यात उतरले आहे. एकाच घरातील तीन मुलांनी अशा प्रकारे सरकारी नोकरी आणि उच्च पदवी मिळवल्याने सरतापे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल आमदार भीमराव केराम, सरस्वती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व्यंकटराव नेमानिवार, सचिव कृष्णकुमार नेमानीवार,  अनुजा पाटील, इंजि. प्रशांत ठमके, मुख्याध्यापिका शुभांगी ठमके, ऍड. के.के. साबळे, प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, प्राचार्य किरण पाईकराव, प्राचार्य डॉ. आनंद भालेराव, प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी, डॉ. सुनील व्यवहारे, डॉ. द्वारकाप्रसाद वायाळ, उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे, मुख्याध्यापक अनिल कांबळे, कृषी अधिकारी विनोद कदम, मामा अमोल बर्डे, गौतम चौदंते आणि काका श्रावण सरतापे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन व शुभेच्छा देऊन या गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अभिनंदन केले आहे.शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द आणि सातत्य असेल तर ग्रामीण भागातील मुलेही राज्याच्या शिरोभागी बसू शकतात, हे या यशाने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

COMMENTS