Homeताज्या बातम्याबीड

5 लाखांसाठी विवाहितेचा छळ; 7 वर्षांच्या मुलासह घराबाहेर हाकलले

ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेराकडून 5 लाख रुपये आणण्याच्या मागणीवरून एका विवाहित महिलेला तिच्या 7 वर्षांच्या मुलासह घराबाहेर हाकलून देत दीर्घकाळ वैवाहि

तोहीद खान हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावीकामरान खान शिवसेना अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख बीड
जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षेखा.बजरंग सोनवणेंनी बीडचा आवाज दिल्लीत घुमवला
शिक्षकांच्या वैद्यकीय बिलांवर 100 रुपये बाँडचा अडथळा’300 पेक्षा जास्त मेडिकल प्रस्ताव वित्त विभागाने फेटाळलेबाँड व नोटरीची अट दूर करून सर्व मेडिकल प्रस्ताव तातडीने निकाली काढावे : महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेची मागणी



ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेराकडून 5 लाख रुपये आणण्याच्या मागणीवरून एका विवाहित महिलेला तिच्या 7 वर्षांच्या मुलासह घराबाहेर हाकलून देत दीर्घकाळ वैवाहिक छळ, मारहाण आणि मानसिक त्रास दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालयातील भरोसा सेल (महिला तक्रार निवारण कक्ष) येथे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारदार दिपाली अजिनाथ माळी (वय 28, रा. अंत्रे, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे आठ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह अजिनाथ मुरलीधर मोरे यांच्याशी झाला. विवाहानंतर काही काळ संसार सुरळीत चालला; मात्र त्यानंतर पती, सासू, भाऊ आणि जाव यांच्या कडून सतत शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिला वारंवार शिवीगाळ, मारहाण, उपाशी ठेवणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. पतीकडून संशय घेऊन मारहाण केली जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच पतीचे जावेसोबत अनैतिक संबंध असल्याचा गंभीर आरोपही तिने केला आहे. महिलेने पुढे नमूद केले की, तिला अनेक वेळा गंभीर मारहाण करण्यात आली असून यात तिच्या मणक्याला दुखापत झाली आहे. एका प्रसंगी कोयत्याने हातावर वार करून मनगट मोडण्यात आले, तर दुसर्‍या वेळी डोक्यावर गज मारल्याने तिला टाके घ्यावे लागले. अलीकडेच, ट्रॅक्टर खरेदीसाठी माहेराकडून 5 लाख रुपये आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी तिच्यावर दबाव टाकला. महिलेने असमर्थता दर्शविल्यानंतर तिचे दागिने काढून घेत, तिला आणि तिच्या 7 वर्षांच्या मुलाला अंगावरील कपड्यांसह घराबाहेर हाकलून देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे पीडितेचे वैवाहिक जीवन असुरक्षित झाले असून तिने संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासनाकडून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

COMMENTS