Homeताज्या बातम्यासंपादकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंदोलन आणि मिशन ! 

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने जगभरातील आंबेडकरी अनुयायी आज चैत्यभूमीवर दाखल झाला आहे. जगातल्या वेगवेगळ्या द

घटनात्मक वर्चस्व कुणाचे !
कोचिंग’वर हातोडा स्वागतार्ह ! 
एका विषयाचे दोन सोबती !

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने जगभरातील आंबेडकरी अनुयायी आज चैत्यभूमीवर दाखल झाला आहे. जगातल्या वेगवेगळ्या देशातून आणि देशातील वेगवेगळ्या राज्यातून येणारा हा जनसमुदाय अरबी सागराच्या किनाऱ्यावर एक जनसागराचे रूप घेतो. हा जनसागर तीन गोष्टींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक स्थळावर भेट करतो. पहिली म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीचे दर्शन घेऊन तो त्यातून बाहेर पडतो;  दुसऱ्या बाजूला ज्ञानसागर असणारे जे ग्रंथ भांडार असतात, त्या ग्रंथ भांडारावर तो आपली ज्ञानाची भूक भागविण्यासाठी वेगवेगळ्या ग्रंथांच्या शोधात आणि ते ग्रंथ आपल्या ग्रंथ भंडारात घेऊन जाण्यासाठी कटीबद्ध असतो. या ग्रंथांना केवळ त्या शोभेच्या वस्तू न बनवता त्या ग्रंथातील विचार वाचनाचे काम तो निश्चितपणे करतो. तरीही कोट्यवधी रुपयांची या ग्रंथांची उलाढाल ज्ञानलालसा आणि हा समुदाय यांच्या अनुषंगाने आज आपण विचार केला, तरीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचं एकूण आजच्या काळात आकलन करणे गरजेचे आहे. तसं पाहिलं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही सामाजिक, आर्थिक आणि मग राजकीय आहे. तशीच ती धम्माची ही आहे. कला, साहित्य, संस्कृती बरोबरच इतिहासाचे सर्वोच्च महत्त्व प्रतिपादन करणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणजे त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वी अवघ्या दोन महिने पूर्वी  बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.  या देशातील जातीव्यवस्थेची क्रमिक असमानता दूर करून त्यांनी नवा विचार या देशात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्याचं पुनरुज्जीवन केलं. पण, आज एकूणच आंबेडकरी चळवळीचं आकलन करताना त्या चळवळीची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दिशेनही यशस्वीतेची मूल्यमापन किंवा चर्चा व्हायला हवी. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे अर्थतज्ञ होते. या देशातली रिझर्व बँक असेल, अर्थव्यवस्था असेल त्याची समीक्षा करून कल्याणकारी राज्य व्यवस्थेची स्टेट सोशालिझम मधून त्यांनी मांडणी केली. या मांडणीत तळागाळातील अंतिम घटकापर्यंत आर्थिक न्याय पोहोचला पाहिजे; किंबहुना त्याला त्यात सहभागी करून घेता आलं पाहिजे, ही त्यांची तळमळ साध्य करण्यासाठी राज्यकर्त्यांनी किती प्रयत्न केले आणि राज्यकर्त्यांनी प्रयत्न केले नसतील तर त्यासाठी आंबेडकरी विचारांच्या चळवळीने त्या राज्यकर्त्यांवर किती दबाव निर्माण केला, हा देखील या निमित्ताने चर्चेला आणण्याचा भाग आहे. कारण कोणतीही चळवळ योग्य दिशेने असेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे तिचा नैतिक पाया मजबूत असेल, तर अशा चळवळीचा प्रभाव आणि दबाव हा सत्ताव्यवस्थेवर निर्माण झाल्याशिवाय राहत नाही! आणि त्या दृष्टीने आज आर्थिक न्याय समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला का याची समीक्षा होणे गरजेचे आहे. कोणतीही चळवळ दोन अंगाने जाते. एक म्हणजे आंदोलन आणि दुसरं म्हणजे मिशन. आंदोलन करण्यासाठी लोकांचं पाठबळ आणि सहभाग मिळवावा लागतो. तर, मिशनसाठी व्यक्तीचा म्हणजे नेतृत्वाचा निर्धार महत्वाचा असतो. आंबेडकरी चळवळ या दोन्ही बाजूने आज कोठे आहे, त्याचे विश्लेषण गरजेचे आहे. महात्मा फुले यांच्या वैचारिक चळवळीचा पाया तळागाळातील समाजापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नेला आहे. या दोन्ही चळवळी इतिहासात एकजीव झाल्या. त्यांचा एकजिवी आणि एकजिनसीपणा पुढे नेण्याचं आवाहन यापुढच्या वैचारिक वारसांना करायचे आहे!

COMMENTS