Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी कार्यस्थळावर जलयात्रेचे बिपीन कोल्हेंकडून स्वागत

कोपरगाव : अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा जलकलश सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर सोमवारी दाखल झाला. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते जलकलशाचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला. प्रास्ताविकात बिपीन कोल्हे यांनी जलयात्रेची संकल्पना स्पष्ट करत राज्य शासन जलसमृद्धीच्या विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचा अभिमान व्यक्त केला. अहिल्यादेवी होळकर यांनी जलव्यवस्थापन, घाट निर्मिती, मंदिर पुनर्बांधणी व लोककल्याणाच्या कार्यातून समाजाला दिशा दिली, याची आठवण करून देत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या जलसमृद्धी योजनांमुळे पाण्याच्या प्रश्नावर प्रभावी काम सुरू असून, गोदावरी खोऱ्यात पाण्याची समृद्धी वाढविण्यासाठी नदीजोड प्रकल्पांतर्गत ७८ टीएमसी पाणी आणण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.   या जलयात्रेचा शुभारंभ चौंडी (अहिल्यानगर) व त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथून करण्यात आला असून ११७ नद्यांचे पाणी एकत्र करून तयार करण्यात आलेला जलकलश राज्यभर फिरविण्यात येत आहे. चौंडी ते महेश्वर असा या यात्रेचा प्रवास असून गावागावांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमास खासदार राम वडकुते, माजीमंत्री सदाभाऊ खोत, गोदावरी मराठवाडा जलसंपदा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार नगराध्यक्ष पराग संधान यांनी मानले. 

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरसकट उन्हाळी सुट्टी द्या; अंगणवाडी सेविका मदतनीस एकजूट सेवा संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
कर्जतमधील घरकुलाच्या पहिल्या हप्त्याचे 100 टक्के वितरण : अजिंक्य सूर्यवंशी; ३१ मार्चपूर्वी काम सुरू न केल्यास मंजुरी रद्द
 पूर्णाकृती पुतळा उभारणीचे काम लवकरच

कोपरगाव : अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा जलकलश सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रावर सोमवारी दाखल झाला. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते जलकलशाचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला.

प्रास्ताविकात बिपीन कोल्हे यांनी जलयात्रेची संकल्पना स्पष्ट करत राज्य शासन जलसमृद्धीच्या विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचा अभिमान व्यक्त केला. अहिल्यादेवी होळकर यांनी जलव्यवस्थापन, घाट निर्मिती, मंदिर पुनर्बांधणी व लोककल्याणाच्या कार्यातून समाजाला दिशा दिली, याची आठवण करून देत त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या जलसमृद्धी योजनांमुळे पाण्याच्या प्रश्नावर प्रभावी काम सुरू असून, गोदावरी खोऱ्यात पाण्याची समृद्धी वाढविण्यासाठी नदीजोड प्रकल्पांतर्गत ७८ टीएमसी पाणी आणण्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केले.

  या जलयात्रेचा शुभारंभ चौंडी (अहिल्यानगर) व त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथून करण्यात आला असून ११७ नद्यांचे पाणी एकत्र करून तयार करण्यात आलेला जलकलश राज्यभर फिरविण्यात येत आहे. चौंडी ते महेश्वर असा या यात्रेचा प्रवास असून गावागावांत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कार्यक्रमास खासदार राम वडकुते, माजीमंत्री सदाभाऊ खोत, गोदावरी मराठवाडा जलसंपदा विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, विविध संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार नगराध्यक्ष पराग संधान यांनी मानले. 

COMMENTS