Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर जिल्ह्यात आठवडाभरात उष्माघाताने तीन बळी

लातूर : मराठवाड्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असून, लातूर जिल्ह्यात उष्माघातामुळे मृत्यूंची चिंताजनक मालिका स

राज्यात उष्णतेचा तडाखा ; विदर्भात तापमान 44 अंशांपार
उष्णतेची तीव्र लाट लक्षात घेता मुदखेड येथे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक गोडसे यांच्याकडून गरजूंसाठी छत्री वाटप
अमरावती जिल्ह्यात दोघांचा उष्माघाताने मृत्यू
लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी; शेतात काम करताना शेतकऱ्याचा मृत्यू |  Navarashtra

लातूर : मराठवाड्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होत असून, लातूर जिल्ह्यात उष्माघातामुळे मृत्यूंची चिंताजनक मालिका समोर येत आहे. गेल्या आठवडाभरात उष्णतेच्या तडाख्याने तिघांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये एका तरुण शेतकर्‍यासह एका लहान बाळाचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील तापमान सतत 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जात असल्याने ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. शेतीकामे आणि दैनंदिन उपजीविकेसाठी बाहेर पडणार्‍या नागरिकांना उन्हाचा मोठा फटका बसत आहे.औसा तालुक्यातील एरंडी येथे 25 वर्षीय महेश लिंबाजी इंगोले यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. शेतातील काम आटोपून ते घरी परतल्यानंतर अचानक चक्कर येऊन ते कोसळले. कुटुंबीयांनी तत्काळ मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना वाचवता आले नाही. कर्त्या तरुणाचा अकाली मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. याच तालुक्यातील गोंद्री येथे आणखी एक हृदयद्रावक घटना घडली. अवघ्या काही महिन्यांच्या शिया नेताजी गोरे या चिमुकलीचा उष्णतेमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घरावरील पत्र्याच्या छतामुळे वाढलेल्या तापमानाचा फटका या बाळाला बसल्याचे सांगितले जात आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे 60 वर्षीय शेतकरी लक्ष्मण दादाराव भंडारे यांचा शेतात काम करताना अचानक मृत्यू झाला. प्रखर उन्हात काम करत असताना ते कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनांमुळे जिल्ह्यातील वाढत्या तापमानाचा गंभीर परिणाम स्पष्ट होत असून, आरोग्य विभागानेही नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळेत शक्यतो बाहेर न पडणे, पुरेसे पाणी पिणे आणि उष्णतेपासून बचावासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

COMMENTS