Homeताज्या बातम्यामनोरंजन

बॉलिवूड स्टार शाहरुख खानच्या ‘मन्नत’ बंगल्यात घुसले दोन तरुण

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड किंग खानच्या चाहत्यांसाठी मोठी चिंतेची बातमी समोर आली आहे. रात्री ९.३० च्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती शाहरुखच्या

राजधानीत राष्ट्रवादीची जोरदार पोस्टरबाजी
Ahmednagar : आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन | LOKNews24
जी च्या निर्णायक गोलने कोरिया रिपब्लिक उपांत्य फेरीत

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड किंग खानच्या चाहत्यांसाठी मोठी चिंतेची बातमी समोर आली आहे. रात्री ९.३० च्या सुमारास दोन अज्ञात व्यक्ती शाहरुखच्या बंगल्यात घुसल्या होत्या. वांद्रे येथील शाहरुखच्या मन्नत या बंगल्यात दोन जण सुरक्षारक्षकांची नजर चुकवून घुसले होते. या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.  मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शाहरूखच्या मन्नत या बंगल्याबाहेर सुरक्षारक्षक तैनात होते. यावेळी त्यांची नजर चुकवत दोन तरुण भिंत तोडून आतमध्ये आले. त्यानंतर त्यांनी लपतछपत मन्नत बंगल्याचा तिसरा माळा गाठला. बाहेर असलेल्या एका सुरक्षारक्षकाची त्या दोघांवर नजर पडली. त्यावेळी ते तिसऱ्या माळ्यावरून आतमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होते. सुरक्षारक्षकांनी या दोन्ही तरुणांना ताब्यात घेतलं आहे. हे दोन्ही तरुण मुळचे सुरत येथील असून एकाचे वय २१ तर दुसऱ्याचे २५ वय आहे. घटना घडल्यानंतर तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. तसेच परवानगी न घेता बंगल्यात प्रवेश केल्याप्रकरणी आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS