Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एन.एम.एम.एसच्या परीक्षेत अर्धापूरची अस्मिता देशमुख नांदेड जिल्ह्यात प्रथम

अर्धापूर : एनएमएमएस परीक्षेत अर्धापूर येथील विद्यार्थिनी कु.अस्मिता श्यामसुंदर देशमुख हिने119 मार्क घेत नांदेड जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा मानपट

अकोले तालुक्यात पूर्वा जाजू प्रथम; मॉडर्न ज्युनियर कॉलेजचा बारावीचा 93.90% निकाल
समता इंटरनॅशनल स्कूलचे दहावीच्या परीक्षेत यश 
शुभम थोरातला एमबीबीएस पदवी  

अर्धापूर : एनएमएमएस परीक्षेत अर्धापूर येथील विद्यार्थिनी कु.अस्मिता श्यामसुंदर देशमुख हिने119 मार्क घेत नांदेड जिल्ह्यात सर्वप्रथम येण्याचा मानपटकावला आहे.
शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही प्रतिभावान विद्यार्थी असून त्यांना योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे शहरांमध्ये शिक्षणाच्या अनेक सोयी सुविधा उपलब्ध असून ग्रामीण भागात त्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात परंतु विद्यार्थ्याने निश्चय केला तर तो सहजपणे यश संपादन करू शकतो त्यासाठी लागणारी मेहनत घेण्यास विद्यार्थी तयार असतात.  मागील वर्षापासून सतत विद्यार्थ्याकडून अभ्यास करून घेत येथील शिक्षक  आकाश कामारीकर यांनी विद्यार्थ्याकडून परिश्रम करून घेत त्यांना मार्गदर्शन केले.  अर्धापूर सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक भास्कर लोखंडे यांनी त्यांचे कौतुक केले असून सर्व शिक्षक वृंदांनी या यशाबद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS