Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्हा रुग्णालयात रक्ताचा तुटवडा; सर्व गटातील रक्तदात्यांनी पुढे यावे – एस.एम. युसूफ

बीड : बीड जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत सर्व रक्तगटांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे गरजू रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण ह

अकोलेत कुपोषणाचे सावट गडद;३८ तीव्र कुपोषित, ३३८ मध्यम कुपोषित बालके; अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांवर नियुक्तीची गरज
शिवसेना जात-धर्मापलीकडे काम करणारा पक्ष : बाफना  उपमुख्यमंत्री शिंदेंच्या माध्यमातून रुग्णास दोन लाखाची मदत
वाडी (बु.) उपजिल्हा रुग्णालयासह नांदेड उत्तरमधील सर्व विकासकामांना गती द्या;नियोजित मुदतीत कामे पूर्ण करण्याच्या आ.कल्याणकर यांच्या अधिकार्‍यांना सूचना
Shortage of blood in Beed district hospital

बीड : बीड जिल्हा रुग्णालयातील रक्तपेढीत सर्व रक्तगटांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे गरजू रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व रक्तगटातील नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुक्त पत्रकार एस.एम. युसूफ यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी नमूद केले आहे की, जिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून मोठ्या संख्येने रुग्ण उपचार व शस्त्रक्रियेसाठी येतात. अनेक शस्त्रक्रियांमध्ये रुग्णांना तातडीने रक्ताची आवश्यकता भासते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रक्तपेढीत सर्वच गटांच्या रक्ताचा तीव्र तुटवडा जाणवत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना खाजगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागत असून, त्यासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागत आहे. काही वेळा आवश्यक गटाचे रक्त तेथेही उपलब्ध न झाल्यास रुग्णांचे प्राण धोक्यात येण्याची शक्यता निर्माण होते. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी, विशेषतः सर्व रक्तगटातील रक्तदात्यांनी पुढे येऊन जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान करावे, असे कळकळीचे आवाहन एस.एम. युसूफ यांनी केले आहे.

COMMENTS