बीड : शहरातील बालेपीर परिसरात आज विविध मूलभूत समस्यांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, नगराध्

बीड : शहरातील बालेपीर परिसरात आज विविध मूलभूत समस्यांच्या अनुषंगाने प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, नगराध्यक्ष प्रतिनिधी मुजीब भाई, स्वच्छता व आरोग्य सभापती निजाम शेख यांच्यासह नगरसेवक राजाभाऊ गुजर, आयुब भाई व खय्युम भाई उपस्थित होते.
पाहणीमध्ये परिसरातील रस्त्यांची दुरवस्था, अपुरी वीज व्यवस्था तसेच नाल्यांच्या स्वच्छतेशी संबंधित समस्या यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या अडचणी लक्षात घेऊन संबंधित अधिकार्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना आश्वासन दिले की बालेपीर परिसरातील सर्व प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देऊन लवकरात लवकर सोडवले जाईल. या प्रसंगी जमील खान, अकबर खान, इरफान शेख, युसुफ भाई, सोहेल खान, अवेज खान, सुजन खान, अन्वर भाई, खलील भाई यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी देखील प्रशासनाने कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.

COMMENTS