Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘राजमुद्रा केसरी’ कुस्तीत गणेश चव्हाणचा गदा; दादा माने ‘कर्जत केसरी’; कर्जतमध्ये रंगला आखाडा 

कर्जत : कै. पै. भास्कर दादा व कै. दिलीप नाना गुलाबराव तोरडमल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘राजमुद्रा केसरी’ व ‘कर्जत तालुका केसरी’ कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या. राजमुद्रा केसरीच्या अंतिम लढतीत पैलवान गणेश चव्हाण यांनी कवलापूरच्या अक्षय माळी याला दमदार ‘ढाक’ डावावर चितपट करत दोन किलो चांदीची गदा आणि मानाचा किताब पटकावला. तर कर्जत तालुका केसरी स्पर्धेत दादा माने यांनी अंतिम फेरीत धुळाजी इरकर याच्यावर ६-७ गुणांच्या फरकाने विजय मिळवत किताबावर नाव कोरले. कर्जत तालुका केसरी स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे : दादा माने (प्रथम), धुळाजी इरकर (द्वितीय), ऋषी काळे (तृतीय) आणि भैय्या मुरकुटे (चतुर्थ).   स्पर्धेदरम्यान अनेक पैलवानांनी आपल्या कौशल्यपूर्ण डावपेचांनी प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी हरियाणा केसरी मनजीत सिंग याला दमदार डावावर चितपट करत मैदान गाजवले. याशिवाय बिरू इरकर, अवि माने, सुयोग माने, यश धोदाड, आबा परदेशी, कुलदीप परदेशी, मयूर खरात, शंभू बिडगर, नारायण खेडकर, प्रणव मोहोळकर, वैभव मासाळ, सोहम गोयकर, शंभू जाधव, आदित्य परदेशी, जियान शेख, सोहम समुद्र, अर्जुन गाडे, अमोल गाडे आदी पैलवानांनी देखील शानदार कुस्त्या सादर केल्या. या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब जंजिरे उपस्थित होते. तसेच आशिष बर्गे, शरद यादव, उद्योगपती सुधीर यादव, योगेश राजे जाधव, राहुल पवार, प्रवीण घुले, नामदेव राऊत, ओम कुलथे, तुषार काकडे, अक्षय राऊत, अशोक तोरडमल, संतोष काळे, बाळासाहेब साळुंखे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. स्पर्धेच्या आयोजनामध्ये रमेश आबा तोरडमल, डॉक्टर राजेश तोरडमल, विजय तोरडमल व इंजिनिअर अमित तोरडमल यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले. स्पर्धेचे पंच म्हणून निलेश मदने, संभाजी निकाळजे, गणेश जाधव व मयूर रोहकले यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. विजू काका तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वर तोरडमल, धरम सिंग परदेशी, किरण समुद्र, महेंद्र दोधाड , अजय नीटके, विकास तोरडमल, किरण नलावडे, गणेश शेळके, अजित शेळके, तुषार जगताप, राहुल मांडगे, वैभव पवार, बापू तोरडमल व सहकाऱ्यांनी स्पर्धेचे नियोजन उत्तम केले.

कचरा समस्येवर कर्जतकरांचा संताप; सामाजिक संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी
कर्जत नगरपंचायतीत प्रा.सतीश पाटील गटनेतेपदी; जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय; १५ पैकी ११ नगरसेवकांचा पाठिंबा
नागलवाडी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी

कर्जत : कै. पै. भास्कर दादा व कै. दिलीप नाना गुलाबराव तोरडमल यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित ‘राजमुद्रा केसरी’ व ‘कर्जत तालुका केसरी’ कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

राजमुद्रा केसरीच्या अंतिम लढतीत पैलवान गणेश चव्हाण यांनी कवलापूरच्या अक्षय माळी याला दमदार ‘ढाक’ डावावर चितपट करत दोन किलो चांदीची गदा आणि मानाचा किताब पटकावला. तर कर्जत तालुका केसरी स्पर्धेत दादा माने यांनी अंतिम फेरीत धुळाजी इरकर याच्यावर ६-७ गुणांच्या फरकाने विजय मिळवत किताबावर नाव कोरले. कर्जत तालुका केसरी स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे : दादा माने (प्रथम), धुळाजी इरकर (द्वितीय), ऋषी काळे (तृतीय) आणि भैय्या मुरकुटे (चतुर्थ).

  स्पर्धेदरम्यान अनेक पैलवानांनी आपल्या कौशल्यपूर्ण डावपेचांनी प्रेक्षकांची मने जिंकली. विशेषतः डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी हरियाणा केसरी मनजीत सिंग याला दमदार डावावर चितपट करत मैदान गाजवले. याशिवाय बिरू इरकर, अवि माने, सुयोग माने, यश धोदाड, आबा परदेशी, कुलदीप परदेशी, मयूर खरात, शंभू बिडगर, नारायण खेडकर, प्रणव मोहोळकर, वैभव मासाळ, सोहम गोयकर, शंभू जाधव, आदित्य परदेशी, जियान शेख, सोहम समुद्र, अर्जुन गाडे, अमोल गाडे आदी पैलवानांनी देखील शानदार कुस्त्या सादर केल्या.

या स्पर्धेस प्रमुख पाहुणे म्हणून भाऊसाहेब जंजिरे उपस्थित होते. तसेच आशिष बर्गे, शरद यादव, उद्योगपती सुधीर यादव, योगेश राजे जाधव, राहुल पवार, प्रवीण घुले, नामदेव राऊत, ओम कुलथे, तुषार काकडे, अक्षय राऊत, अशोक तोरडमल, संतोष काळे, बाळासाहेब साळुंखे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. स्पर्धेच्या आयोजनामध्ये रमेश आबा तोरडमल, डॉक्टर राजेश तोरडमल, विजय तोरडमल व इंजिनिअर अमित तोरडमल यांनी अतिशय मोलाचे योगदान दिले.

स्पर्धेचे पंच म्हणून निलेश मदने, संभाजी निकाळजे, गणेश जाधव व मयूर रोहकले यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. विजू काका तोरडमल यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वर तोरडमल, धरम सिंग परदेशी, किरण समुद्र, महेंद्र दोधाड , अजय नीटके, विकास तोरडमल, किरण नलावडे, गणेश शेळके, अजित शेळके, तुषार जगताप, राहुल मांडगे, वैभव पवार, बापू तोरडमल व सहकाऱ्यांनी स्पर्धेचे नियोजन उत्तम केले.

COMMENTS