महापुरुषांच्या प्रतिमा डोक्यावर घेण्यापेक्षा विचार डोक्यात घ्या – प्रा. मंगलताई खिंवसरा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापुरुषांच्या प्रतिमा डोक्यावर घेण्यापेक्षा विचार डोक्यात घ्या – प्रा. मंगलताई खिंवसरा

जामखेड प्रतिनिधी फुले - शाहू - आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याची लढाई आयुष्यभर लढली. आपणही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालण्याची गरज आहे. तरच या रा

कोपरगाव शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करावा – मंगेश पाटील
समता स्पोर्टस क्लब बेलापूरच्या अध्यक्षपदी संजय शेलार
संगमनेरमध्ये मुस्लीमबांधव उतरले रस्त्यावर | LOKNews24

जामखेड प्रतिनिधी फुले – शाहू – आंबेडकरांनी माणूस म्हणून जगण्याची लढाई आयुष्यभर लढली. आपणही त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून चालण्याची गरज आहे. तरच या राज्यातील वंचित, बहुजन समाजातील महिलांना न्याय मिळू शकतो. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले हे एकमेकांचे प्रेरणास्रोत होते. महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी साजऱ्या करतांना महापुरुषांच्या प्रतिमा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांचे विचार डोक्यात घेतले पाहिजेत तरच आदर्श समाज घडू शकतो. असे प्रतिपादन येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रा. मंगलताई खिंवसरा यांनी केले.ग्रामीण विकास केंद्राच्या वतीने अँड अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सावित्री उत्सव कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  निवारा बालगृहाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात टोल ग्रुप पुणे एच.आर. मॅनेजर जयंती ताई फडके अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख उपस्थितीत ग्रामीण विकास केंद्रच्या सचिव उमाताई जाधव, मुख्याध्यापिका शोभाताई कांबळे, उषा प्रधान, जयश्री ताई फडके, संगीता केसकर, सुनिताताई जाधव आदी उपस्थित होत्या.जयंती ताई फडके म्हणाल्या, ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून अँड. डॉ.अरुण जाधव, उमा ताई जाधव व त्यांचा गृप आदिवासी, वंचित व निराधार घटकांसाठी काम करतो. त्यामुळे तुम्ही आपापल्या गावातील गरजू लोकांना शोधा व त्यांना ग्रामीण विकास केंद्रापर्यंत आणा असे आवाहन जयंती ताई फडके यांनी उपस्थित महिलांना केले. प्रस्तावना करतांना उमा जाधव म्हणाल्या, सावित्री उत्सवाच्या निमित्ताने स्त्रियांना गुलामगिरीची जाणीव व्हावी, त्यांनी त्यावर काही विचार करावा. आणि तुमच्यातूनही एखादी नवी सावित्री घडावी असे त्या म्हणाल्या.तसेच सावित्रीबाई फुलेंच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.यावेळी सावित्री बाईंचा जागर करत सजवलेल्या बैलगाडीतून क्रांती ज्योती सावित्री बाई फुले यांची प्रतिमांची लेझीम ढोल ताशा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत राजमाता जिजाऊ, क्रांती ज्योती सावित्री बाई फुले, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.वैशाली मुरूमकर यांनी  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तरडगावच्या सरपंच संगीता केसकर यांनी आभार मानले. 

COMMENTS