कुंडलवाडी : अतिशय कठीण परिस्थितीत अडकलेल्या वानराच्या लहान पिल्लाची वनविभागाच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका करण्यात आली. बिलोली परिसरातील एका आंब्य

कुंडलवाडी : अतिशय कठीण परिस्थितीत अडकलेल्या वानराच्या लहान पिल्लाची वनविभागाच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका करण्यात आली. बिलोली परिसरातील एका आंब्याच्या झाडाला लावलेल्या जाळीमध्ये हे पिल्लू अडकले होते. ही बाब लक्षात येताच वनरक्षक व वनपाल बिलोली यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पोहोचून त्यांनी काळजीपूर्वक प्रयत्न करत जाळीमधून वानराच्या पिल्लाला सुरक्षितपणे बाहेर काढले. या बचावकार्यात कोणतीही दुखापत होऊ नये याची विशेष काळजी घेण्यात आली. या वेळी वनपरिमंडळ अधिकारी बिलोली डी. एस. डावकोरे, वनरक्षक व्ही. एम. अंबुलगे तसेच वनमजूर शेषेराव इंगळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे एका निरपराध जीवाचे प्राण वाचले असून परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.

COMMENTS