Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

  ‘अमृतवाहिनी अभियांत्रिकी’चे विविध स्पर्धांत यश

 संगमनेर  : अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत SAE India आयोजित TIFAN 2026 आणि REEV 202

शरद पवारांच्या योगदानामुळे ‘रयत’ची उंची वाढली : शिंदे  
‘कृष्णप्रिया’ संस्थेचे बाल सुसंस्कार शिबीर उत्साहात
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथीनिमित्त कोपरगावात उत्साहात
अव्वल अभियांत्रिकी महाविद्यालय | अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग संगमनेर

 संगमनेर  : अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करत SAE India आयोजित TIFAN 2026 आणि REEV 2026 या प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दुहेरी यशामुळे महाविद्यालयाने तांत्रिक शिक्षण, संशोधन आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प विकास क्षेत्रात आपली भक्कम ओळख अधोरेखित केली आहे.

बंगळुरू येथे २३ ते २४ जानेवारी २०२६ दरम्यान आयोजित REEV 2026 स्पर्धेत देशभरातील आठ संघांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत अमृतवाहिनीच्या मेकॅनिकल विभागातील ‘Team TurboTitans’ या संघाने उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, नावीन्यपूर्ण डिझाइन आणि प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. या संघात ३० विद्यार्थ्यांचा सहभाग होता. संघाने विकसित केलेल्या वाहनामध्ये कार्यक्षम ऊर्जा व्यवस्थापन, मजबूत संरचना आणि आधुनिक अभियांत्रिकी तत्त्वांचा प्रभावी वापर दिसून आला. या यशाबद्दल संघाला ११ लाख रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.

 तसेच २ ते ३ एप्रिल २०२६ दरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे आयोजित TIFAN 2026 या राष्ट्रीय स्पर्धेतही महाविद्यालयाने बाजी मारली. मल्टी ट्रान्सप्लांटर यंत्राच्या निर्मिती व कार्यप्रदर्शनावर आधारित या स्पर्धेत देशभरातील ३८ संघ सहभागी झाले होते. ‘Mavericks 8.0’ या संघाने सर्व फेऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण व प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक मिळवला. या संघात २० विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

COMMENTS