Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कैलास टेकडीकडे जाणार्‍या भाविकांचा ऑटो पलटी; चालकासह 8 जण गंभीर जखमी

माहूर : श्रीक्षेत्र माहूर येथील श्री दत्त शिखर घाटामध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. कैलास टेकडीवर दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या ऑटोचा

सांगलीत लग्नाच्या आनंदावर विरजण; येरळा नदीत पोहताना ८ मुलं बुडाली
नांदेड शहरात अवैध बॅनर कोसळल्यामुळे युवक जखमी; जखमी युवकाचा महापालिकेला सवाल
समृद्धी महामार्गावर गॅस गळती थरार; 25 किलोमीटर वाहनांच्या रांगा

माहूर : श्रीक्षेत्र माहूर येथील श्री दत्त शिखर घाटामध्ये शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. कैलास टेकडीवर दर्शनासाठी जात असलेल्या भाविकांच्या ऑटोचा ताबा सुटून तो पलटी झाल्याने चालकासह आठ जण गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार (दि.17) रोजी सकाळी सुमारे 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील येळेगाव तुकाराम येथील भाविक ऑटो (क्र. एम. एच 37 जी 4726 ) द्वारे माहूर गडावरील श्री कैलास टेकडीच्या दर्शनासाठी येत होते. श्री दत्त शिखर घाटातून काळापाणी तलाव मार्गे जात असताना घाटातील तिसर्‍या अत्यंत धोकादायक वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ऑटो पलटी झाला. या अपघातात ऑटो चालक गजानन नागरे (वय 32) यांच्यासह अश्विनी दुर्गे (32), लक्ष्मीबाई काळे (42), अर्णव दुर्गे (9), प्रशांत काळे (13), मीना काळे (35), सपना काळे (36) आणि दत्ता काळे (38) हे गंभीर जखमी झाले. काही प्रवासी ऑटोतून बाहेर फेकले गेले, तर काहीजण वाहनाखाली अडकल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. अपघाताची माहिती मिळताच श्री रेणुका देवी संस्थानची म्बुलन्स घटनास्थळी दाखल झाली. म्बुलन्स चालक विनोद जाधव व स्वच्छता कर्मचारी वैभव दळवी यांनी तत्परता दाखवत जखमींना बाहेर काढून माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. बिपिन बाबळे आणि त्यांच्या टीमने जखमींवर प्राथमिक उपचार केले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. या घटनेची नोंद संबंधित पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. घाटातील धोकादायक वळणांमुळे वारंवार अपघात होत असल्याने प्रशासनाने तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.

COMMENTS