Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रणिता देवरे प्रदेश पातळीवर भाजपात सक्रिय ?

नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे- चिखलीकर प्रदेश स्तरावरील कार्यक्रमांना उपस्थित राहत असून जिल्ह्यात

महापौर कार्यालयातून ‘अनधिकृत सत्ता’ चालतेय का? संतोष मुळे यांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे मनपा प्रशासनात खळबळ
शिवालय उद्योग समूह आणि संध्याताई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बचत गटातील महिलांना सवलतीच्या दरात पिठाच्या गिरण्या व शिलाई मशिनचे वाटप
वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा विलंब विद्यार्थ्यांसाठी डोकेदुखी; वेळबद्धतेची मागणी तीव्र

नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे- चिखलीकर प्रदेश स्तरावरील कार्यक्रमांना उपस्थित राहत असून जिल्ह्यात मात्र त्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत आहे.
नारी शक्ति वंदन विधेयकाच्या निमित्ताने प्रदेश स्तरावर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांच्या समवेत पत्रकार परिषदेत त्या उपस्थित होत्या. मात्र नांदेड जिल्ह्यातील भाजपाच्या कार्यक्रमांना त्यांची अनुपस्थिती जाणवत आहे.  नांदेड जिल्ह्यातील नेतृत्व विशेषत्वाने महिला आघाडीच्या कार्यक्रमांना त्यांना बोलावत नसल्याची माहिती मिळत आहे.  भारत मातेच्या मातृशक्तीची ताकद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओळखलेली असल्यामुळे विकसित भारताच्या निर्मितीसाठी नारीशक्ती वंदन विधेयकाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होणार असून महिलांना 33 टक्के आरक्षण राजकारणात मिळणार आहे. भारताच्या संसदेमध्ये महिलांचा सहभाग केवळ 14% राहिल्यामुळे महिला सशक्तीकरणाच्या प्रक्रियेला विलंब होत आहे. या विधेयकामुळे देशाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून अनुसूचित जाती जमातीच्या महिलांनाही आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. नारीशक्ती वंदन विधेयकाच्या निमित्ताने प्रणिता देवरे सक्रिय झाल्या असून प्रदेशास्तरावर त्यांची उपस्थिती वाढलेली दिसून येत आहे.

COMMENTS