बीड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अंडर-16 संघ आज बिडकीनकडे रवाना झाल

बीड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित निमंत्रित क्रिकेट स्पर्धेसाठी बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अंडर-16 संघ आज बिडकीनकडे रवाना झाला. संघाला उत्साहपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.
ही स्पर्धा पुढील 15 दिवस चालणार असून प्रत्येक संघाला पाच सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत बीड जिल्ह्याचा संघ उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास पदाधिकार्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे, सेंट्रल झोन संघातही बीड जिल्ह्यातील चार खेळाडूंची निवड झाली असून त्यांनाही लवकरच रवाना करण्यात येणार आहे. संघातील निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंप्रमाणे व्हाईट किट व ट्रॅव्हलिंग किट देण्यात आले. हे किट एडीएफसी क्रिकेट क्लब व युनिक स्पोर्ट्स यांच्या सौजन्याने उपलब्ध करून देण्यात आले. त्यांच्या या उपक्रमाचे पदाधिकारी व पालकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. यावेळी बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव डॉ. आमेर सलीम, तसेच महेश वाघमारे, राजन साळवी, जावेद पाशा, मनोज जोगदंड, रिजवान खान यांच्यासह एडीएफसी क्रिकेट क्लबचे राजेश जाधव, सुनील गोपी शेट्टी, गोपाल गुरखुदे, मेनकुदुळे सर, अतिक कुरेशी, अक्षय नरवडे व पठाण शाहरुख आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.

COMMENTS