Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत ‘हिंदू महासंमेलन’ उत्साहातभव्य बाईक रॅली, भारतमाता पालखी सोहळा; विविध मान्यवरांचे मार्गदर्शन

शिर्डी : शिर्डी व पंचक्रोशीतील हिंदू बांधवांसाठी आयोजित ‘हिंदू महासंमेलन’ बुधवारी (दि. १५ एप्रिल) उत्साहात पार पडले.  संमेलनाचे प्रमुख वक्ते राजा

शेवगावमध्ये महिलांना चाकूच्या धाकावर लुटण्याचे प्रयत्न; कारवाईची मागणी; नागरिकांचे पोलिसांना निवेदन
संजीवनी इंजिनिअरिंगच्या नऊ विद्यार्थ्यांना नोकरी
रांजणगाव-पिंपरी गवळी येथे शिवरस्त्याच्या कामास प्रारंभ

शिर्डी : शिर्डी व पंचक्रोशीतील हिंदू बांधवांसाठी आयोजित ‘हिंदू महासंमेलन’ बुधवारी (दि. १५ एप्रिल) उत्साहात पार पडले.  संमेलनाचे प्रमुख वक्ते राजाभाऊ मुळे व भरत आमदापुरे यांनी सुरुवातीला श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भगव्या ध्वजाच्या फडकावणीने भव्य बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली.
  शेकडो युवक-युवतींच्या सहभागाने निघालेली ही रॅली द्वारका सर्कलपर्यंत पोहोचली. तेथून माता-भगिनींच्या उपस्थितीत भारतमाता पालखी सोहळा काढण्यात आला. मुख्य कार्यक्रमस्थळी भारतमाता व श्री साईबाबांची महाआरती करण्यात आली.
 सायंकाळी साई किमया गार्डन येथे ‘मी भगवा ध्वज बोलतोय..!’ हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. साई निर्माण शाळेच्या विद्यार्थ्यांनी अशोक गोंदकर व मणिलाल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरण केले.
 ‘हिंदू विशेष’ सत्रात गुरुवर्य ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांनी उपस्थितांना आशीर्वचन दिले. रा.स्व.संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रविंद्र गणेश मुळे यांनी संघ शताब्दीनिमित्त पंचपरिवर्तनाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी शिष्टाचार व ‘स्वबोध’ याविषयी मार्गदर्शन केले. तसेच भरत आमदापुरे यांनी हिंदू धर्मासमोरील आव्हाने व संघटित समाजाची गरज यावर विचार मांडले.
संमेलनाच्या शेवटी उपस्थितांना हिंदू धर्म रक्षणाची शपथ देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगन्नाथ गोंदकर यांनी केले. मान्यवरांचा सत्कार दत्तात्रय लुटे, तुकाराम गोंदकर व रंजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन विशाल तिडके यांनी, तर आभार प्रदर्शन अजित पारख यांनी केले.

COMMENTS