शहरातील पोचम्मा मंदिराच्या मागील भागात रसायनमिश्रित ताडीची खुलेआम विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शुद्ध ताडी विक्री केंद्र या

शहरातील पोचम्मा मंदिराच्या मागील भागात रसायनमिश्रित ताडीची खुलेआम विक्री सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शुद्ध ताडी विक्री केंद्र या नावाखाली प्रत्यक्षात रसायनमिश्रित शिंदीची बिनदिक्कत विक्री केली जात असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
माहितीनुसार, संबंधित विक्रेते तेलंगणा राज्यातून मिळणार्या ‘गुलफारम’ या रसायनाचा वापर करून कृत्रिम पद्धतीने शिंदी तयार करत आहेत. ही कृत्रिम शिंदी मानवी आरोग्यास अत्यंत घातक ठरू शकते. तिच्या सेवनामुळे गंभीर दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर, अशा रसायनमिश्रित शिंदीच्या सेवनामुळे काही अघटीत घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ आर्थिक फायद्यासाठी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याची तीव्र भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, या प्रकाराकडे संबंधित शुल्क उत्पादन (एक्साईज) विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याची टीका होत आहे. त्यामुळे अशा अवैध व धोकादायक ताडी विक्रीवर तात्काळ बंदी घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS