Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्गावर लखमापूरजवळ रस्ता खचला; अपघाताची भीती

मुक्रमाबाद : नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161-ए वरील मुक्रमाबादजवळील लखमापूर परिसरात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली असून, व

पथदिवे बंद, मालेगाव रोडवर अंधाराचे साम्राज्य; उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका वाढला
अर्धापूर-असना महामार्गावरील अतिक्रमणांवर ‘थातूर-मातूर’ कारवाई; नागरिकांचा संताप वाढला
हिमायतनगरमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला धोका; शाळेसमोर तातडीने उपाययोजनांची मागणी

मुक्रमाबाद : नांदेड-बिदर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161-ए वरील मुक्रमाबादजवळील लखमापूर परिसरात रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली असून, वाहनधारकांसाठी हा मार्ग सध्या धोकादायक ठरत आहे. जमिनीच्या वादातून काही शेतकर्‍यांनी न्यायालयात धाव घेतल्यामुळे येथील रस्त्याचे काम अर्धवट राहिले आहे. परिणामी, पावसामुळे माती वाहून जाऊन रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे.
एकाच वेळी दोन वाहने जाणे कठीण झाले आहे. रस्त्याच्या एका बाजूचे काम रखडल्याने मार्ग अत्यंत अरुंद झाला आहे. सध्या या ठिकाणी एकावेळी केवळ एकच वाहन कसाबसा जाऊ शकते. समोरून दुसरे वाहन आल्यास अपघात होण्याची शक्यता वाढते. विशेषतः रात्रीच्या वेळी पथदिव्यांची व्यवस्था नसल्याने खचलेल्या रस्त्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे धोका अधिकच वाढतो. प्रशासकीय दुर्लक्षाचा आरोप स्थानिक नागरिकांच्या मते, रस्ता खचलेला असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. घटनास्थळी कोणतेही सूचना फलक, धोक्याचे चिन्ह किंवा बॅरिकेड्स नसल्याने वाहनधारकांना धोका ओळखणे कठीण जात आहे. त्वरित दुरुस्तीची मागणी हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे येथे सतत जड वाहतूक सुरू असते. रस्ता खचल्याने मोठे अपघात होण्याची भीती आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी लखमापूर व मुक्रमाबाद परिसरातील नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच जाग येणार का, असा संतप्त सवाल वाहनधारकांकडून उपस्थित केला जात आहे.

COMMENTS