Homeताज्या बातम्याअहमदनगर

संजीवन समाधी सोहळ्याची जय्यत तयारी; जामखेडहून तेरसाठी दिंडी रवाना

जामखेड : तालुक्यातील भक्तांच्या पुढाकाराने श्री.क्षेत्र तेर जि. धाराशिव येथे होणारा धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारा 'संत गोरोबा काका स

जामखेडमध्ये नर्सची स्वतःच इंजेक्शन लाऊन आत्महत्या   
लाठ्याकाठ्यांनी मारहाण; उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू; पिंपळगाव उंडा येथील घटना; मुख्य आरोपी अटकेत
‘एनएमएमएस’मध्ये नागेश विद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
संत श्रेष्ठ श्री संत गोरोबा काका संजीवन समाधी मंदिर, श्री क्षेत्र तेर 🌸

जामखेड : तालुक्यातील भक्तांच्या पुढाकाराने श्री.क्षेत्र तेर जि. धाराशिव येथे होणारा धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपणारा ‘संत गोरोबा काका संजीवन समाधी सोहळा’ यंदाही मोठ्या उत्साहात साजरा होत असून भाविकांच्या पुढाकाराने भक्तिमय वातावरणात जामखेड ते श्रीक्षेत्र तेर या पायी दिंडीचे प्रस्थाण झाले. श्री. क्षेत्र तेर येथे आज पासून पुढील चार दिवस कीर्तन, प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला यंदा विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, कुंभार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. विठ्ठलराव राऊत यांनी सुरू केलेल्या जामखेड-तेर पायी दिंडी सोहळ्याला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्या पश्चात या दिंडीची परंपरा विनायक राऊत व भक्तगण समर्थपणे पुढे नेत आहेत. त्यांच्या पुढाकारातूनच तेर येथे संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

दि. १२ ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान होणाऱ्या या सोहळ्यात दररोज सकाळी व रात्री कीर्तन-प्रवचनांचे सत्र रंगणार आहे. यामध्ये ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, ह.भ.प. शिवाजी महाराज लोंढकर, ह.भ.प. संतोष महाराज बांगर यांसारख्या नामवंत कीर्तनकारांचा सहभाग राहणार आहे. सोमवारी एकादशी निमित्त विशेष कार्यक्रम व श्रीक्षेत्र तेर येथे नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. तर बुधवारी हभप कैलास भोरे यांचे कीर्तन हा सोहळ्याचा प्रमुख आकर्षण ठरणार आहे.

समाधी स्थळाच्या विकासासाठी स्व. राऊतांचा पुढाकार

-जामखेड व परिसरातील ग्रामस्थ, सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा सोहळा पार पडत असून हजारो भाविक उपस्थितीत राहतात. यावर्षीचा सोहळ्याकरिता भाविकांना मोठ्या संख्येने सहभागी होऊन या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

-श्री क्षेत्र तेर येथील संत गोरोबाकाका संजीवन समाधी स्थळाच्या विकास कामांसाठी अखिल भारतीय कुंभार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष स्व. विठ्ठलराव राऊत यांनी पुढाकार घेऊन या तीर्थक्षेत्राचा समावेश शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात करण्यास भाग पाडले होते.

-तसेच दरवर्षी येथे संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये राऊत यांचा पुढाकार राहिला त्यांच्या पश्चात चिरंजीव विनायक राऊत व भक्तगणांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम पुढे सुरू ठेवला आहे.

COMMENTS