Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापुरुषांना जातीत अडकवू नका : शहाजी डोके

जामखेड : महापुरुषांच्या नावाने राजकारण करत त्यांना जातींत विभागण्याचा प्रयत्न होत असून समाजात विभाजनाची बीजे पेरली जात आहेत. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी महापुरुषांना जातमुक्त करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शहाजी डोके यांनी केले. छत्रपती राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. डोके म्हणाले की, एकीकडे शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा आव आणला जातो; मात्र दुसरीकडे त्यांच्या जातींच्या आधारे ‘तो आमचा, तो त्यांचा’ असा विषारी विचार समाजात पसरविला जात आहे. काही राजकीय गट विशिष्ट विचारसरणीचा अट्टाहास करत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी संविधानाच्या मूल्यांमुळेच देश एकसंघ राहू शकतो आणि महापुरुषांचे विचार समाजाला एकत्र ठेवू शकतात. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन भानुदास बोराटे होते. त्यांनी आपल्या मनोगतात सर्व महापुरुषांनी संपूर्ण समाजासाठी कार्य केले असल्याचे सांगत त्यांच्या जयंती उत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरे करावेत व त्यांच्या विचारांचे आचरण करावे, असे आवाहन केले. यावेळी राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेचे चेअरमन भानुदास बोराटे, व्हाईस चेअरमन प्रदीप शेटे, संचालक गुलाब जांभळे,हाबीब खान, भास्कर बेरड, नामदेव राळेभात,संस्थेचे व्यवस्थापक बिजू सदाफुले, बँकेचे कर्मचारी लक्ष्मी गवळी, अभिजित उबाळे, सकलेन शेख, अमोल खेत्रे,केतन राऊत, अनिल म्हेत्रे, संजय खराडे, कुंडल राळेभात, गफ्फार शेख,विक्रम मेंगडे, संजय बेलेकर,राजू ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.  कार्यक्रमात गुलाब जांभळे व कुंडल राळेभात यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचार मांडले. सूत्रसंचालन नामदेव राळेभात यांनी केले.

पिंगेवाडीमध्ये डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन  
उंबरेमध्ये भीम जन्मोत्सव सोहळा उत्साहात विद्यार्थ्यांचा सत्कार; भिमगीतांनी परिसर दणाणला
तुलसी इंग्लिश स्कूलमध्ये महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा

जामखेड : महापुरुषांच्या नावाने राजकारण करत त्यांना जातींत विभागण्याचा प्रयत्न होत असून समाजात विभाजनाची बीजे पेरली जात आहेत. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी महापुरुषांना जातमुक्त करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शहाजी डोके यांनी केले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

डोके म्हणाले की, एकीकडे शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा आव आणला जातो; मात्र दुसरीकडे त्यांच्या जातींच्या आधारे ‘तो आमचा, तो त्यांचा’ असा विषारी विचार समाजात पसरविला जात आहे. काही राजकीय गट विशिष्ट विचारसरणीचा अट्टाहास करत समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी संविधानाच्या मूल्यांमुळेच देश एकसंघ राहू शकतो आणि महापुरुषांचे विचार समाजाला एकत्र ठेवू शकतात.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे चेअरमन भानुदास बोराटे होते. त्यांनी आपल्या मनोगतात सर्व महापुरुषांनी संपूर्ण समाजासाठी कार्य केले असल्याचे सांगत त्यांच्या जयंती उत्सव सर्वांनी एकत्र येऊन साजरे करावेत व त्यांच्या विचारांचे आचरण करावे, असे आवाहन केले.

यावेळी राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेचे चेअरमन भानुदास बोराटे, व्हाईस चेअरमन प्रदीप शेटे, संचालक गुलाब जांभळे,हाबीब खान, भास्कर बेरड, नामदेव राळेभात,संस्थेचे व्यवस्थापक बिजू सदाफुले, बँकेचे कर्मचारी लक्ष्मी गवळी, अभिजित उबाळे, सकलेन शेख, अमोल खेत्रे,केतन राऊत, अनिल म्हेत्रे, संजय खराडे, कुंडल राळेभात, गफ्फार शेख,विक्रम मेंगडे, संजय बेलेकर,राजू ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रमात गुलाब जांभळे व कुंडल राळेभात यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विचार मांडले. सूत्रसंचालन नामदेव राळेभात यांनी केले.

COMMENTS