Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

होर्मुझमधील तणावातही ‘जग विक्रम’ भारतात; कांडला बंदरात एलपीजीसह सुरक्षित दाखल

नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीत भारतासाठी दिलासा देणारी घडामोड घडली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबं

अमरावती जिल्ह्यात दोघांचा उष्माघाताने मृत्यू
अखेर 9 वर्षांचा प्रतीक्षेचा शेवट: चर्‍हाटा प्राथमिक आरोग्य केंद्राला वीजजोडणी; डॉ. गणेश ढवळे यांच्या आंदोलनाला यश
बुलडाण्यात माजी सैनिकांसाठी आरोग्य सेवेला नवे बळ; कमांडिंग मेजर जनरलच्या हस्ते दवाखान्याचे भूमिपूजन!


नवी दिल्ली : पश्‍चिम आशियातील तणावपूर्ण परिस्थितीत भारतासाठी दिलासा देणारी घडामोड घडली आहे. होर्मुझ सामुद्रधुनीत सुरू असलेल्या अमेरिकेच्या नाकेबंदीच्या पार्श्‍वभूमीवर ‘जग विक्रम’ हे भारतीय द्रवरूप पेट्रोलियम वायू वाहतूक करणारे जहाज सुरक्षितपणे बुधवारी गुजरातमधील कांडला बंदरात दाखल झाले. सुमारे वीस हजार चारशे मेट्रिक टन द्रवरूप वायू घेऊन आलेले हे जहाज बुधवारी सकाळी बंदरात पोहोचले.
अमेरिका आणि इराण यांच्यात जाहीर झालेल्या दोन आठवड्यांच्या तात्पुरत्या युद्धविरामानंतर होर्मुज सामुद्रधुनी पार करणारे हे पहिले भारतीय जहाज ठरले आहे. यापूर्वी 11 एप्रिल रोजी ‘जग विक्रम’ने अत्यंत संवेदनशील समजल्या जाणार्‍या या मार्गातून यशस्वीपणे प्रवास पूर्ण केला होता. मार्चच्या सुरुवातीपासून आतापर्यंत होर्मुजच्या पश्‍चिम भागातून बाहेर पडणारे हे भारताचे नववे जहाज आहे. तणाव सुरू होण्यापूर्वी या परिसरात भारताची एकूण अठ्ठावीस जहाजे होती. त्यापैकी चोवीस जहाजे पश्‍चिम भागात, तर चार जहाजे पूर्व भागात अडकून पडली होती. युद्धविरामाच्या घोषणेपूर्वीच पश्‍चिम भागातून भारताची आठ जहाजे सुरक्षित बाहेर काढण्यात आली होती. तसेच पूर्व भागातूनही दोन जहाजांना मार्ग काढण्यात यश आले होते. आता ‘जग विक्रम’च्या आगमनामुळे आणखी एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. तरीदेखील काही भारतीय जहाजे अद्याप त्या परिसरात अडकलेली असून परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत होण्याची प्रतीक्षा सुरू आहे.
दरम्यान, पर्शियन आखातात अनेक परदेशी जहाजेही अडकून पडली असून होर्मुज मार्ग पुन्हा सुरळीत सुरू होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मार्गाचे महत्त्व लक्षात घेता भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर या घडामोडींचा थेट परिणाम होत आहे. भारत आपल्या पेट्रोलियम गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर आयातीवर अवलंबून आहे. देशाच्या एकूण गरजेपैकी सुमारे अठ्ठ्याऐंशी टक्के कच्चे तेल परदेशातून येते. त्याचप्रमाणे सुमारे अर्धा नैसर्गिक वायू आणि जवळपास साठ टक्के द्रवरूप पेट्रोलियम वायू आयात केला जातो. खाडी देशांतून येणारा हा पुरवठा मुख्यत्वे होर्मुज सामुद्रधुनीमार्गेच होत असल्याने त्या मार्गातील अडथळ्यांचा थेट परिणाम देशांतर्गत पुरवठ्यावर होत आहे. पश्‍चिम आशियातील संघर्षामुळे काही काळ हा मार्ग जवळपास ठप्प झाला होता. अशा परिस्थितीत ‘जग विक्रम’चे सुरक्षित आगमन हे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

COMMENTS