Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीरामपूरच्या निशाणेबाजांची चमकदार कामगिरी

श्रीरामपूर : महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय “महाराष्ट्र एअर गन स्पर्धा २०२६” मध्य

खाशाबा जाधवांना पद्मविभूषण देण्याबाबत निर्णय घ्या; कोल्हापूर खंडपीठाच्या उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
ऐतिहासिक! वैशाली रमेशबाबूने रचला इतिहास; फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट जिंकणारी पहिली भारतीय महिला!
मुस्लिम आरक्षण मोर्चाला सशर्त पाठिंबा; संयोजकांनी भूमिका स्पष्ट करावी-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार

श्रीरामपूर : महाराष्ट्र रायफल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय “महाराष्ट्र एअर गन स्पर्धा २०२६” मध्ये श्रीरामपूर येथील “द अल्टिमेट स्पोर्ट शूटिंग अकॅडमी” च्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी करत मोठे यश संपादन केले आहे. या स्पर्धेत अकॅडमीच्या चार निशाणेबाजांनी आगामी प्री-नॅशनल स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.
पात्र ठरलेले खेळाडू पुढीलप्रमाणे – आरणा प्रितेश कुंकूलोळ (१० मीटर पिप साइट रायफल) हिने सब-यूथ व यूथ गटातून पात्रता मिळवली आहे. प्रीशा प्रितेश कुंकूलोळ (१० मीटर एअर पिस्टोल) हिने सब-यूथ, यूथ व ज्युनियर या तिन्ही गटांत उत्कृष्ट कामगिरी करत निवड निश्चित केली.
अवनी सागर तलवार (१० मीटर एअर पिस्टोल) हिनेही सब-यूथ, यूथ व ज्युनियर गटातून यश मिळवले.
पायल सागर तलवार (१० मीटर एअर पिस्टोल) यांनी सीनियर गटातून प्री-नॅशनलसाठी पात्रता मिळवली आहे.
तसेच आर्या राहुल राऊत, प्रणव कैलास अघाव आणि विराज वैभव शित्रे या खेळाडूंनी ओपन साइट रायफल प्रकारात उत्कृष्ट प्रदर्शन करत श्रीरामपूरचे नाव उज्ज्वल केले. या सर्व खेळाडूंना श्रीरामपूरचे राष्ट्रीय स्तरावरील निशाणेबाज केतन विजय वाघ यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या क्रीडा प्रकाराचा लाभ घ्यावा आणि उपलब्ध संधींचा फायदा करून घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.सर्व विजेत्यांचे श्रीरामपूर तालुका  क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर खंडागळे ,संजय राजुळे,बाॕबी बकाल,गौरव डेंगळे आदिंनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS