Homeताज्या बातम्याअहमदनगर

बुद्ध विहारात धम्माचे संस्कार करून आदर्श समाज निर्माण करा-पूज्य भिक्खु धम्मशिल थेरोभव्य रॅलीनंतर पालवन चौक येथे बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापणा

बुद्ध विहारात धम्माचे संस्कार करून आदर्श समाज निर्माण करा, असे प्रतिपादन पूज्य भिक्खु धम्मशिल थेरो यांनी केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोब

नगर अर्बनचे प्रशासन संशयाच्या भोवर्‍यात
स्वच्छतागृहांसाठी सव्वाकोटींचा निधी मंजूर : नगराध्यक्ष संधान
शिरसाटवाडीतील विकास कामांची शासकीय समितीकडून पाहणी



बुद्ध विहारात धम्माचे संस्कार करून आदर्श समाज निर्माण करा, असे प्रतिपादन पूज्य भिक्खु धम्मशिल थेरो यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन दया, क्षमा, शांती, करुणा आणि मैत्रीचा संदेश दिला. तथागत बुद्धांच्या सद्धम्माचा प्रसार व प्रचार करण्याच्या उद्देशाने दि. 13 एप्रिल, सोमवार रोजी पालवन चौक ते नागसेन बुद्ध विहारपर्यंत भव्य मिरवणूक काढून बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख भिक्खू म्हणून पूज्य भिक्खु डॉ. इंदवंस्स महाथेरो (छत्रपती संभाजीनगर), पूज्य भिक्खु धम्मशील थेरो (महाविहार धम्मभूमी, शिवणी), पूज्य भिक्खु अश्वजित, पूज्य भिक्खु सुमेधबोधी आणि पूज्य भद्रेय (छत्रपती संभाजीनगर) उपस्थित होते. यावेळी भिक्खूंनी उपासक-उपासिकांना धम्मदेसना दिली. कार्यक्रमात बोलताना पूज्य भिक्खु धम्मशिल थेरो म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्रांती केली. त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारून दया, शांती व करुणेचा मार्ग दाखवला. हा धम्म प्रत्येक अनुयायाने आत्मसात करणे आवश्यक आहे. तसेच दर रविवारी बुद्ध विहारात बुद्ध वंदना घेऊन धम्माचे आचरण करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी परिश्रम घेतलेल्या कार्यकर्त्यांचा सत्कार केला. कार्यक्रमात विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रा. प्रदीप रोडे, सुशिलाताई मोराळे, अ‍ॅड. भगवान कांडेकर, प्रा. विठ्ठल गाडे, शितलकुमार सुकाळे, अच्युत उजगरे, डॉ. अमरेंद्र विद्याघर, उमाजी वाघमारे, अ‍ॅड. कल्याण गाडे, नगरसेवक प्रमोद शिंदे, शितल चक्रे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव इनकर व विश्वमाला इनकर यांनी केले. नागसेन बुद्ध विहार, पालवन चौक (बीड) येथे आयोजित हा बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना व अनावरण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बीड शहर यांच्याकडे शिल्लक असलेल्या निधीतून साजरा करण्यात आला.

COMMENTS