Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुस्लिम नेते शेख युनूस यांचा राजकीय नेत्यांवर गंभीर आरोप; जिल्ह्यातील नेत्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रात सध्या काही राजकीय नेते मुस्लिम समाजाविरोधात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप मुस्लिम नेते शेख युनूस यांनी केला आहे. त्यांनी पत्रक

मुख्याध्यापकांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा; विद्यार्थ्यांना ‘एक्झाम पॅड’चे वाटपसामाजिक कार्यकर्ते मुसाखान पठाण व शेख वसीम यांचा आदर्श उपक्रम
बीडमध्ये सामाजिक संस्थांची बैठक संपन्न
गाडगेबाबांच्या विचारांची परंपरा जपणार्‍या सभेत फुले जयंती उत्साहात; बारुळकरांना श्रद्धांजली



महाराष्ट्रात सध्या काही राजकीय नेते मुस्लिम समाजाविरोधात जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप मुस्लिम नेते शेख युनूस यांनी केला आहे. त्यांनी पत्रकारांशी बोलताना मंत्री नितेश राणे, आमदार गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर समाजात तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करत असल्याचा दावा केला.
शेख युनूस यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित नेते मुस्लिम समाजाला लक्ष्य करत असून, जातीय शिवीगाळ तसेच धार्मिक स्थळांजवळ जाणूनबुजून आक्षेपार्ह वर्तन करून समाजात तणाव निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. राज्यात काय चालले आहे याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे आणि जातीय तेढ निर्माण करणार्‍यांना समज द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील नेत्यांवरही प्रश्न उपस्थित करत, काही नेते संबंधित राजकीय नेत्यांसोबत आहेत का, असा सवाल केला. तसेच मुस्लिम समाजाच्या हितासाठी जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येऊन संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, या वक्तव्यांमुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS