Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ; तिघांविरुद्ध गुन्हा

शेवगाव :  शहरात देहविक्रीच्या संशयावरून पोलिसांनी कारवाई करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलांना जबरदस्तीने अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाड

खेळातील वादातून कबड्डीपटूवर झाडल्या गोळ्या; हनुमानगड येथील धक्कादायक घटना
श्रीरामपूर येथील एका डॉक्टरला बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी आरोपींना १० मेपर्यंत पोलीस कोठडी
चोरीची अल्युमिनियम तार घेऊन जाणारा आयशर टेम्पो पकडला; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शेवगाव :  शहरात देहविक्रीच्या संशयावरून पोलिसांनी कारवाई करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलांना जबरदस्तीने अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास शेवगाव-नेवासा मार्गावरील सूर्या लॉजिंगमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिता कानिफनाथ पवार यांनी फिर्याद दिली आहे.

 या फिर्यादीवरून नारायण अंकुश झाडे (रा. भेंडा ऑफिसजवळ, शेवगाव), विशाल अर्जुन व्यवहारे (रा. नवीन दहिफळ, ता. शेवगाव) आणि प्रवीण सुरेश लांडे (रा. शेवगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तक्रारीनुसार, आरोपींनी पीडित महिलांना लॉजवर बोलावून त्यांच्यासाठी राहण्याची व्यवस्था केली. त्यानंतर पुरुष ग्राहकांना तेथे बोलावून पैशांच्या मोबदल्यात महिलांकडून देहविक्री करून घेतली जात होती. तसेच महिलांना बळजबरीने अनैतिक संबंध ठेवण्यास भाग पाडले जात असल्याचेही समोर आले आहे. या व्यवहारातून मिळणाऱ्या पैशांपैकी काही रक्कम महिलांना देऊन उर्वरित रक्कम आरोपी स्वतःकडे ठेवत असल्याची माहितीही उघड झाली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

COMMENTS