Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रद्धा आणि अंधश्रद्धा…!

आज श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात संघर्ष म्हणण्यापेक्षा मतभेद असल्याचे जाणवून येते. ज्या गोष्टी श्रद्धेने केल्या जातात, त्या अंधश्रद्धा असल्याचे

रात्रभर महिलांचा दरबार; बकऱ्याचं काळीज अन् दारुआता रिधम बाबा EXPOSE !
अशोक खरातला 26 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी; बचाव पक्षाचा कोठडी वाढवण्याच्या मागणीला जोरदार विरोध
इथे आत्मे फिरतात आणि विकास रोखतात छ.संभाजीनगर महानगरपालिकेच्या इमारतीबाबत मंत्री शिरसाट यांचे विधान
Superstition vs Faith: What The Church Doesn't Want You To Know


आज श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यात संघर्ष म्हणण्यापेक्षा मतभेद असल्याचे जाणवून येते. ज्या गोष्टी श्रद्धेने केल्या जातात, त्या अंधश्रद्धा असल्याचे सांगितले जाते. मुळात हा अतिशय संवेदनशील प्रश्‍न आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेला काय म्हणावे किंवा कोणत्या गोष्टी अंधश्रद्धा आहेत हे ती बाब स्पष्ट झाल्याशिवाय समजून येत नाही. अगदी ताजे उदाहरण म्हणजे नुकताच उघड झालेले रमेश खरात प्रकरण. तो जे करत होता ती निव्वळ अंधश्रद्धा होती हे कदाचित अनेकांनी समजूनसुद्धा त्याचा नाद सोडला नाही. त्याच्या जाळ्यात कोणकोण अडकले होते ते आता स्पष्ट होत आहे.साध्या गोष्टी लक्षात घेतल्या तरी आपल्याही लक्षात येईल, की या अंधश्रद्धा आहेत. उंबरठ्यावर शिंक आली असता काम होत नाही असे मानले जाते. मुळात शिंक येणे ही काही अंधश्रद्धा नाही. यामागे असलेली शास्त्रीय कारणे शाळेत असतानाच शिकलेली असतात. पण शिंक आली असता कामे होत नाही अशी मानसिकता लहानपणापासून मनात बसली असल्यामुळे आपण थोडे थांबतो. शिंक आल्यावर दोन पावले मागे येऊन मग बाहेर पडावे असे सांगितले जाते. शिवाय जवळपास ज्याने शिंक दिली त्यालाही दोन शब्द ऐकवले जातात. महत्त्वाच्या कामात विघ्न आणले असे सुनावले जाते. परंतु शिंक येणे हा नैसर्गिक प्रकार असून शिंकल्याने काही अघटित होत नाही किंवा कोणत्या अडचणीही येत नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे.भूत असणे हा एक प्रकार लोकांच्या मनात घर करून बसला आहे. विशेषतः स्मशानात भुतं असतात असा लोकांचा ठाम समज असतो.यासाठी काही संस्थांतर्फे जनजागरण करण्यात आले असले तरी ही भीती कुठेतरी मनात घर करून राहिली असतेच. त्यातच चिंचेच्या झाडावर भुतं असतात हा ठाम विश्‍वास असतो.  मुळात दाट पानांच्या झाडांवर पक्षी घरटे बांधतात. त्यांचा निवास त्या झाडांवर असताना भुतं कशाला त्या झाडांवर राहतील? आणि आधी ती असायला तर पाहिजेत. याबाबतीत गोंदमाळ येथील एक जुनी घटना आठवते. साधारण 20 वर्षापूर्वीची ही घटना असेल. गोंदेमाळ गाव डोंगराळ भागात वसले आहे. रात्री भुतांची पालखी डोंगरात नाचते असा अनेक जणांचा समज झाला होता. रात्रीच्या वेळी ठिणग्या उडणे, ज्वाळा दिसणे असे प्रकार तेथे दिसायचे. लोकांना वाटायचे तेथे भुतांचे राज्य आहे. रात्री त्यांचा दरबार भरत असेल. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचे ठरवले. त्यांनी प्रत्यक्ष रात्री जाऊन तो प्रकार उघडकीस आणला. रात्री तेथे हातभट्टी दारू गाळण्याचा व्यवसाय चालायचा. त्यासाठी भट्टी पेटवली जायची. त्या भट्टीतील निखारे उडायचे. त्यामुळे आग आणि निखारे दिसायचे. समितीने पोलिसांच्या सहकार्याने तो प्रकार उघड करून लोकांना या अंधश्रद्धेपासून परावृत्त केले. मुळात आपले मन विचारी असते. पण एखादी गोष्ट मनाशी पक्की ठरवली, की त्याचा सहसा प्रतिवाद केला जात नाही कारण त्या गोष्टीचा ठसा मनावर पक्का उमटलेला असतो. जादूगार जादू करतो. त्यामागे कोणताही चमत्कार नसतो. हातचलाखी आणि शब्दांच्या ओघात प्रेक्षकांना खिळवून ठेवत जादूगार जादू दाखवत असतो. त्याचे कारण विज्ञान हेच असते. आज अनेक बाबा, बुवा भक्तीचा बाजार मांडतांना दिसतात. त्यांना ओळखणे महत्त्वाचे आहे. आजही गोंदवले, शिर्डी, शेगाव, अक्कलकोट अशा ठिकाणी कोणत्याही शुल्काशिवाय किंवा देणगीशिवाय भाविकांना दर्शन घेता येते. या ठिकाणी विनामूल्य महाप्रसाद भाविकांना दिला जातो. तरीही कामतसारख्या भोंदूंकडे लोक का वळतात हे न समजणारे कोडे आहे. मुळात या बाबा लोकांना अंगमेहनत करायची सवय नसते. विनासायास पैसा मिळवायचा असतो. भाविकांच्या लक्षात या गोष्टी येतात, पण त्यावेळी उशीर झालेला असतो. श्रद्धा अवश्य असावी, पण ती डोळस असावा..!!

शिवाजी चौगुले
कागल-कोल्हापूर

COMMENTS