Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड एलसीबीची धडाकेबाज कारवाईसोमनवाडी शिवारात धाबा चालकाकडून गावठी पिस्टल जप्त, एकास अटक

बीड :जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणार्‍यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने(एलसीबी) मोठी कारवाई करत बर्दापूर पोलीस ठाण

नांदेड विभागात विशेष तिकीट तपासणी; 4.65 लाखांचा महसूल
सीना नदीपात्रात वाळू चोरी विरोधात कारवाई; कर्जत पोलिसांची कामगिरी ; सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे शहरात खंडणीप्रकरणात पीएसआयसह तिघांवर गुन्हा
LCB's crackdown : एलसीबीची धडक कारवाई : गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह  आरोपी जेरबंद

बीड :
जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणार्‍यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने(एलसीबी) मोठी कारवाई करत बर्दापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमनवाडी शिवारात छापा टाकून गावठी बनावटीचे पिस्टल जप्त केले असून एका धाबा चालकाला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, सोमनवाडी शिवारातील धाबा चालक विलास अंकुश चाटे हा स्वतःकडे बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगत असून तो आपल्या धाब्यावर उपस्थित आहे. या माहितीची तातडीने शहानिशा करून एलसीबी पथकाने 10 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजता संबंधित ठिकाणी सापळा रचत छापा टाकला. छाप्यादरम्यान पोलिसांनी धाबा चालक विलास चाटे यास घटनास्थळीच ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून अंदाजे 40,000 रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्टल जप्त करण्यात आले आहे. प्राथमिक तपासात आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलीस नाईक गोविंद भताने यांच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 97/2026 नोंदवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम (शस्त्र कायदा) कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बर्दापूर पोलीस करत आहेत. जप्त करण्यात आलेले पिस्टल आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणामागे कोणती मोठी शस्त्र पुरवठा साखळी आहे का, आरोपीचा कोणत्या गुन्हेगारी टोळ्यांशी संबंध आहे का, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक (अंबाजोगाई) चेतना तिडके, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, अंमलदार गोविंद भताने, रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णू सानप, सचिन आंधळे, विकी सुरवसे, अतुल हराळे आणि विकास राठोड यांचा सहभाग होता. बीड जिल्ह्यातील अवैध शस्त्रांविरुद्ध सुरू असलेल्या कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांचा कडक वचक बसत असल्याचे चित्र दिसत आहे.

COMMENTS