Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चोरीची अल्युमिनियम तार घेऊन जाणारा आयशर टेम्पो पकडला; साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्तस्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बीड : स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी मोठी कारवाई करत चोरीची विद्युत वितरण कंपनीची अल्युमिनियम तार वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला असून सुमारे साड

दिल्लीत कारमध्ये पाच जणांचा होरपळून मृत्यू
देशद्रोह प्रकरणात रामपालला जामीन
संभाजीनगरमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणीची भरदिवसा हत्या

बीड :
स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांनी मोठी कारवाई करत चोरीची विद्युत वितरण कंपनीची अल्युमिनियम तार वाहतूक करणारा आयशर टेम्पो पकडला असून सुमारे साडेनऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली होती की, दिनांक 09.04.2026 रोजी एका विटकरी रंगाच्या आयशर टेम्पोतून विद्युत वितरण कंपनीची अल्युमिनियम वाहिनी (तार) चोरी करून विक्रीसाठी बीड ते नेकनूर मार्गे केजकडे नेली जात आहे. या माहितीच्या आधारे नांदूर फाट्याजवळ सापळा रचून पोलिसांनी सदर टेम्पो अडवून चालकास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान चालकाचे नाव सुखदेव सुभाष गायके (वय 31, रा. धारूर, जि. बीड) असे निष्पन्न झाले. वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये 12 बंडल अल्युमिनियम तार (अंदाजे 1500 किलो, किंमत सुमारे 4,50,000 रुपये) आढळून आली. तसेच वाहतुकीसाठी वापरलेला आयशर टेम्पो देखील जप्त करण्यात आला आहे. एकूण मिळून सुमारे 9,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 140/2026, कलम 124 म.पो.अ.अ. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई चैतना तिडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाळे, सोमनाथ गायके, आशपाक सय्यद, मनोज परजणे, सिद्धेश्वर मांजरे, विकास राठोड आदींच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली आहे.

COMMENTS