संगमनेर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित,वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. बहुजनांच्या विकासाचा समतेचा व पुरोगामी विचार त्यांनी जगाला दिला असून सर्व धर्म समभाव, बंधुता,समता जोपासणारा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणारा असल्याचे प्रतिपादन जय हिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. माळीवाडा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, धनंजय डाके, सोमेश्वर दिवटे, अरुण हिरे,अभिजीत ढोले,,नितीन अभंग, निशा शिवूरकर आदींसह पदाधिकारी व युवक कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना तांबे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगाला समतेचा विचार दिला. बहुजनांच्या विकासाचा विचार करून आयुष्यभर काम केले. उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय लोकशाही व राज्यघटनेमध्ये सर्व समाज सुधारक, संत यांचे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर भारतीय राज्यघटना आहे. देश अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी या राज्यघटनेतील या मूलभूत विचारांची देशाला गरज आहे असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालय येथे ही क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सुरेश थोरात, प्रा.बाबा खरात, डॉ नितीन भांड, रामदास तांबडे आदींसह संगमनेर मधील विविध कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आ.डॉ.तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

संगमनेर : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी सर्वप्रथम शेतकरी, शोषित,वंचित यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. बहुजनांच्या विकासाचा समतेचा व पुरोगामी विचार त्यांनी जगाला दिला असून सर्व धर्म समभाव, बंधुता,समता जोपासणारा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा मानवतावादी विचारच देशाला पुढे नेणारा असल्याचे प्रतिपादन जय हिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
माळीवाडा येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गा तांबे, धनंजय डाके, सोमेश्वर दिवटे, अरुण हिरे,अभिजीत ढोले,,नितीन अभंग, निशा शिवूरकर आदींसह पदाधिकारी व युवक कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना तांबे म्हणाले की, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जगाला समतेचा विचार दिला. बहुजनांच्या विकासाचा विचार करून आयुष्यभर काम केले. उपेक्षित वर्गाला गुलामीच्या जोखडातून मुक्त करून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतीय लोकशाही व राज्यघटनेमध्ये सर्व समाज सुधारक, संत यांचे विचार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांवर भारतीय राज्यघटना आहे. देश अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठी या राज्यघटनेतील या मूलभूत विचारांची देशाला गरज आहे असे ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालय येथे ही क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सुरेश थोरात, प्रा.बाबा खरात, डॉ नितीन भांड, रामदास तांबडे आदींसह संगमनेर मधील विविध कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकनेते बाळासाहेब थोरात व माजी आ.डॉ.तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

COMMENTS