Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव पाणीपुरवठा योजनेत लोकप्रतिनिधींकडून अडथळे: मुंढे 

शेवगाव : शहर पाणीपुरवठा योजना व नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये काही तालुकास्तरीय लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करीत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते अरुण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत केला. पूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक सल्लागार संस्थेने योजनेत अनेक त्रुटी ठेवल्याने तिची मान्यता रद्द करण्यात आली असून, नव्या संस्थेमार्फत सुधारित आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.या पत्रकार परिषदेस शिवसेना तालुकाप्रमुख आशुतोष डहाळे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाचे हरीश भारदे, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे ताहेर पटेल तसेच नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.मुंडे यांनी सांगितले की, जुनी तांत्रिक संस्था रद्द करण्याचा ठराव नगरपरिषद बैठकीत मंजूर होऊ नये यासाठी प्रयत्न झाले. मात्र ठराव मंजूर झाल्यानंतरही काही भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. तरीही जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेचा निर्णय कायम ठेवला. काही लोकप्रतिनिधींनी नगरसेवकांवर दबाव टाकण्यासाठी फोन केल्याचा आरोपही त्यांनी केला असून, त्याचे रेकॉर्डिंग आपल्या ताब्यात असल्याचा इशारा त्यांनी दिला.सध्याच्या कामांचा आढावा देताना त्यांनी सांगितले की, शहरातील १२३ किमीपैकी ५१ किमी अंतर्गत पाइपलाइन पूर्ण झाली आहे, तर जायकवाडी जलाशय ते शेवगाव १७ किमीपैकी १४ किमी काम पूर्ण झाले आहे. जुन्या आराखड्यात शहरालगतचा सुमारे ४० टक्के भाग वगळण्यात आला होता. नव्या नियोजनात तो समाविष्ट केल्याने सुमारे ५० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे. तसेच, कमी व्यासाच्या जलवाहिन्यांमुळे पाण्याचा दाब कमी होण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी मोठ्या व्यासाच्या पाइपलाइन टाकाव्या लागणार आहेत. दोन अतिरिक्त जलकुंभ उभारले जाणार असून, २०६० सालातील ७५,६८६ लोकसंख्या गृहीत धरून योजना तयार करण्यात आली आहे. अशुद्ध पाणी पंपिंग क्षमता १२० एचपीवरून १९० एचपीपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, सुधारित प्रस्तावानुसार पाइपलाइनची लांबी ६,३२९ मीटरवरून १२,६५४ मीटरपर्यंत वाढली असून, शहरांतर्गत वितरण जाळे १२३ किमीवरून तब्बल २६६ किमीपर्यंत विस्तारले जाणार आहे. त्यामुळे योजनेची क्षमता व पाणीपुरवठा कव्हरेज वाढणार असले तरी प्रकल्प खर्चात मोठी वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘क्रिकेटपटू श्रद्धाळू की अंधश्रद्धाळू ?’ पुस्तकाचे प्रकाशन
बीडमध्ये 31 मे रोजी 51 मुस्लिम सामूहिक विवाह; रहेबर फाऊंडेशनची घोषणा
एका महिन्यात नांदेड जिल्ह्यात 36 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश1098 हेल्पलाईनच्या मदतीने महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई

COMMENTS