Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहात सापडले मोबाईल

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये कायद्यांना मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही बेकायदेशीररित्या कारागृहात मोबाईलचा कैद्यांनी

सुरेंद्रकुमार आणि विशाल अग्रवालला 31 मेपर्यंत पोलिस कोठडी
पुण्यात बनावट दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश
…तर पाय उतार होणेच इष्ट!

पुणे/प्रतिनिधी ः पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहामध्ये कायद्यांना मोबाईल वापरण्यास बंदी असतानाही बेकायदेशीररित्या कारागृहात मोबाईलचा कैद्यांनी वापर केल्याप्रकरणी कारागृह प्रशासनाच्या वतीने चार कैद्या विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार राजू तुकाराम असवले, सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप, आकाश उत्तम रणदिवे आणि तालीम आसमोहम्मद खान या चार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी सॅमसंग कंपनीचे काळ्या रंगाचा मोबाईल, बॅटरी ,सिमकार्ड तसेच कचडा कंपनीचा राखाडी रंगाचा एक मोबाईल जप्त केला आहे. याबाबत येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंगाधिकारी रेवनाथ कडू कानडे (वय 54) यांनी आरोपींविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार कारागृह कायदा 1894 नियम 42 ,45 ,भादवी कलम 188 ,120 ब ,34 नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार ते सहा ऑगस्ट दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान येरवडा मध्यवर्ती कारागृहात तक्रारदार कानडे हे तुरुंगाधिकारी म्हणून काम करत होते.त्यावेळी न्यायालयीन बंदी तालीम आसमोहम्मद खान हा मोबाईल वापरत असल्याची गोपनीय माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे त्याला बोलवून त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या अंगझडतीत त्यांच्या खिशात एक राखाडी रंगाचा कचाडा कंपनीचा मोबाईल फोन बॅटरीसह लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आला. तसेच इतर कैद्याची तपासणी केली असता, टिळक सेपरेट खोली क्रमांक 30 मध्ये झडती घेतली असता, न्यायालयीन बंदी राजू तुकाराम अस्वले याच्या अंगझडतीत पँटच्या खिशात एक काळ्या रंगाचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन बॅटरीसह व एअरटेल कंपनीचे चिन्ह असलेले सिम कार्ड लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आला. चौकशीमध्ये कैदी राजू असवले, सचिन घोलप, आकाश रणदिवे यांनी आपापसात संगणमत करून येरवडा मध्यवर्ती कारागृहात कटकारस्थान करून सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन बॅटरीसह व सिम कार्डसह कारागृहाबाहेरून घेऊन जाऊन त्याचा वापर करून कारागृह नियमाचा भंग केला म्हणून सदर आरोपीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पुढील तपास येरवडा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे या करत आहे.

COMMENTS