Homeताज्या बातम्याअहमदनगर

तांभेरे येथे मृतावस्थेत आढळला बिबट्या

 देवळाली प्रवरा : तांभेरे गावातील साहेबराव मुसमाडे यांच्या घासाच्या शेतात शुक्रवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.  मृत बिबट्याच्या डोळ्याजव

अकोलेत हॉटेल, ढाब्यांची झाडाझडती
हॉटेल व्यवसायासाठी ११ लाखांची मागणीविवाहितेचा छळ, पतीसह सहा जणांवर गुन्हा
कोपर्डीतील शेतकऱ्यांवर चुकीच्या पंचनाम्यामुळे अन्याय; नागरिकांचा आरोप ; तहसीलदारांकडे न्यायाची मागणी

 देवळाली प्रवरा : तांभेरे गावातील साहेबराव मुसमाडे यांच्या घासाच्या शेतात शुक्रवारी सकाळी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.  मृत बिबट्याच्या डोळ्याजवळ जखमा आढळून आल्याने त्याची इतर एखाद्या वन्य प्राण्याशी झुंज झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.संबंधित शेत परिसरात घास, मका, डाळिंब व ऊस यांसारखी दाट पिके मोठ्या प्रमाणात असल्याने पाणी व आच्छादन उपलब्ध होते. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात बिबट्यांसह इतर वन्य प्राण्यांची वर्दळ वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. गेल्या काही काळात बिबट्या व इतर वन्य प्राण्यांच्या हालचालींबाबत ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. दरम्यान, साहेबराव मुसमाडे, नंदकुमार दिघे, बंडू मुसमाडे व अशोक पवार यांनी या घटनेची माहिती तत्काळ वन विभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामा करण्यात आला असून, बिबट्याचे शवविच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट केले जाणार आहे. त्यानंतर नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.यावेळी वनपरिक्षेत्राधिकारी दत्तात्रेय साळुंखे, राहुरी वनपाल बाळासाहेब आटोळे, कानडगाव वनपाल व वनरक्षक संदीप कोरके, वडनेर वनरक्षक एम.बी.ससे, मुसा पठाण, बाळासाहेब दिवे, ताराचंद गायकवाड आदींनी घटनास्थळी भेट दिली.डोंगराळ भागात पाणी व गारवा कमी झाल्यामुळे बिबट्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण असून, वन विभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्यांच्या हालचाली असलेल्या ठिकाणी पिंजरे लावावेत, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

COMMENTS