Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर शहरात आढळला स्फोटकांचा साठा

नागपूर : नागपूर शहरात मंगळवारी सकाळी बॉम्ब असल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दोसर भवन चौक परिसरातील लांजेवार इमारतीत ज

नाशिक कुंभमेळयाच्या कामांमध्ये टेंडर घोटाळा; कथित ऑडिओ किल्पच्या आधारे काँगे्रस नेते वडेट्टीवार यांची टीका
भोंदू अशोक खरातला मदत करणारे रडारवर; एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांची माहिती
ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट! ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाचा दिमाखात शुभारंभ

नागपूर : नागपूर शहरात मंगळवारी सकाळी बॉम्ब असल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दोसर भवन चौक परिसरातील लांजेवार इमारतीत जिलेटीनच्या कांड्यासह स्फोटकांचा साठा आढल्याने खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराचा ताबा घेतला. काही काळासाठी या भागात मोठी खळबळ उडाली होती. प्राथमिक तपासात संबंधित वस्तू ही स्फोटक बॉम्ब नसून जिलेटीनच्या कांड्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला असला तरी या कांड्या येथे कशा आणि कुणी ठेवल्या, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

COMMENTS