Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

जयपूरमध्ये परदेशी पर्यटक महिलेशी गैरवर्तन

जयपूर : शहरातील आमेर परिसरात एका परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही महिला जपान येथून राजस्थान भ्रमंतीसाठी आली

कणकवलीत बांधकाम व्यावसायिकाचा गूढ मृत्यू; डोक्याला गंभीर जखम, रक्ताचे डाग आढळल्याने खळबळ
झिरवाळ व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण; तृतीयपंथीय व्यक्तीची भावाविरोधात गंभीर तक्रार
रक्तरंजित सूडनाट्याने नांदेड हादरले; गँगवारमध्ये तिघांचा खून

जयपूर : शहरातील आमेर परिसरात एका परदेशी महिला पर्यटकासोबत गैरवर्तन झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. ही महिला जपान येथून राजस्थान भ्रमंतीसाठी आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रविवारी सकाळच्या सुमारास जयगड किल्ला परिसर पाहण्यासाठी गेली होती. किल्ल्याजवळील टेकडीवरील मार्गाने ती गणेश मंदिराच्या दिशेने जात असताना काही तरुणांनी तिचा पाठलाग केला. निर्जन भागात महिला एकटी असल्याचे पाहून पाच जणांनी तिला घेरल्याचा आरोप आहे. त्यांनी तिच्याशी अशोभनीय वर्तन करत छेडछाड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांतील दृश्यांच्या आधारे संशयितांची ओळख पटवण्याचे काम वेगाने सुरू आहे.

COMMENTS