Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जवळवाडीत यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांचा हंगामा

खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील जवळवाडी येथे बजरंगबली यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यात्रेनिमित्त कावडीधारकांची मिरवणूक, धार्मिक कार्यक्रमांसह पारंपरिक कुस्त्यांचा आखाडा रंगला होता. यावेळी पैठण येथून गंगाजल आणून बजरंगबलींचा अभिषेक करण्यात आला. डीजेच्या तालावर बजरंगबलींच्या गाण्यांसह कावडीधारकांची मिरवणूक काढण्यात आली. यात्रेसाठी गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसेच बाहेरगावी गेलेले नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. सालाबादप्रमाणे यंदाही कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. या कुस्त्यांसाठी नामांकित पैलवान सहभागी झाले होते. रंगलेल्या चुरशीच्या झुंजींमध्ये विजयी पैलवानांना ग्रामस्थांच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सरपंच भागवत गोल्हार, उपसरपंच अशोक गोल्हार, दीपक खाडे, शिवनाथ गोल्हार, देविदास गोल्हार, आनंदा खाडे, दत्ता मोरे, निलेश खाडे, लाला खाडे, अंबादास खोमणे, बाबुराव गोल्हार, सुनील खाडे, पंडित पानसरे, गणेश गोल्हार, अण्णा कोल्हार, हनुभाऊ मित्र मंडळाचे सदस्य, विष्णू खाडे, सुभाष गर्जे, सुरेश गर्जे, सुरेश खाडे, संजय गुल्ला, सुभाष खाडे, माऊली गोल्हार, मंगेश खाडे, प्रल्हाद कीर्तने, सोमा मोरे, गणेश गोल्हार, मेघराज दराडे, कपिल खेडकर आदी उपस्थित होते.

राहात्यात रंगणार ‘गळवंती’चा थरार; परंपरा आणि लोकसंस्कृतीचा उत्सव; राजा वीरभद्र महाराज यात्रोत्सवाची जय्यत तयारी
 कर्मवीर शंकरराव काळे यांची उद्या जयंती
गौतम सहकारी बँकेस चार कोटींचा नफा  

खरवंडी कासार : पाथर्डी तालुक्यातील जवळवाडी येथे बजरंगबली यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न झाला. यात्रेनिमित्त कावडीधारकांची मिरवणूक, धार्मिक कार्यक्रमांसह पारंपरिक कुस्त्यांचा आखाडा रंगला होता.

यावेळी पैठण येथून गंगाजल आणून बजरंगबलींचा अभिषेक करण्यात आला. डीजेच्या तालावर बजरंगबलींच्या गाण्यांसह कावडीधारकांची मिरवणूक काढण्यात आली. यात्रेसाठी गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसेच बाहेरगावी गेलेले नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सालाबादप्रमाणे यंदाही कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. या कुस्त्यांसाठी नामांकित पैलवान सहभागी झाले होते. रंगलेल्या चुरशीच्या झुंजींमध्ये विजयी पैलवानांना ग्रामस्थांच्या वतीने बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी सरपंच भागवत गोल्हार, उपसरपंच अशोक गोल्हार, दीपक खाडे, शिवनाथ गोल्हार, देविदास गोल्हार, आनंदा खाडे, दत्ता मोरे, निलेश खाडे, लाला खाडे, अंबादास खोमणे, बाबुराव गोल्हार, सुनील खाडे, पंडित पानसरे, गणेश गोल्हार, अण्णा कोल्हार, हनुभाऊ मित्र मंडळाचे सदस्य, विष्णू खाडे, सुभाष गर्जे, सुरेश गर्जे, सुरेश खाडे, संजय गुल्ला, सुभाष खाडे, माऊली गोल्हार, मंगेश खाडे, प्रल्हाद कीर्तने, सोमा मोरे, गणेश गोल्हार, मेघराज दराडे, कपिल खेडकर आदी उपस्थित होते.

COMMENTS