Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा

तेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर इराणने अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-35 प्रकारातील लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. इराण

पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात; 10 रूपये कपातीचा केंद्र सरकारचा निर्णय
पेट्रोकेमिकल क्षेत्राला दिलासा; 40 उत्पादनांवरील सीमा शुल्क माफ
युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या; प्रति बॅरल 115 डॉलरच्या वर पोहोचल्या किंमती

तेहरान : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर इराणने अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-35 प्रकारातील लढाऊ विमान पाडल्याचा दावा केला आहे. इराणमधील अर्ध-सरकारी वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत विमान गंभीररीत्या बाधित झाले असून वैमानिकाच्या बचावाची शक्यता अत्यल्प असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अमेरिकन सेंट्रल कमांडकडून या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने यापूर्वी एक दृश्यफीत प्रसिद्ध केली होती. या दृश्यफितीत क्षेपणास्त्राने हवेतच एका विमानाला लक्ष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित दलाच्या मते, पहाटे सुमारे तीनच्या सुमारास मध्य इराणच्या आकाशात प्रगत हवाई संरक्षण प्रणालीच्या साहाय्याने हे लक्ष्य भेदण्यात आले. एफ-35 प्रकारातील लढाऊ विमान हे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून ते रडारपासून लपून कार्य करण्याची क्षमता ठेवते. त्यामुळे अशा विमानाला इजा पोहोचल्याचा दावा अमेरिकेच्या हवाई वर्चस्वाला धक्का देणारा ठरू शकतो, अशी चर्चा तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. यापूर्वीही अशाच प्रकारच्या घटनेत एका विमानाला आपत्कालीन उतराई करावी लागल्याचे अमेरिकेकडून सांगण्यात आले होते, आणि त्या वेळी वैमानिक सुरक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. इराणकडून अमेरिकेला थेट इशारा देण्यात आला आहे. इराणच्या लष्करी नेतृत्वातील अली जहांशाही यांनी कठोर शब्दांत प्रतिक्रिया देत, कोणताही हल्ला झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला. इराणची भूमी आक्रमणकर्त्यांसाठी घातक ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्‍वभूमीवर इराकमधील बगदाद येथील अमेरिकन दूतावासाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. पुढील एक-दोन दिवसांत हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन अमेरिकन नागरिकांना तातडीने इराक सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS