Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात वादळी पावसाचा कहर; गारपिटीने पिकांचे नुकसान, वृक्ष कोसळून महिलेचा मृत्यू

पुणे : शहरात गुरुवारी दुपारनंतर अचानक हवामानाने तीव्र कलाटणी घेतली आणि भर उन्हात काळे ढग दाटून आले. काही मिनिटांतच वादळी वार्‍यासह मुसळधार पावसान

१० जूनपूर्वी मान्सूनच्या आगमनाची शक्यता धूसर; राज्यात वादळी पावसाचा अंदाज, पेरणीची घाई टाळण्याचे आवाहन
बेमोसमी अवकळा!
अवकाळीचा तडाखा !

पुणे : शहरात गुरुवारी दुपारनंतर अचानक हवामानाने तीव्र कलाटणी घेतली आणि भर उन्हात काळे ढग दाटून आले. काही मिनिटांतच वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक भागांत जोरदार सरींसोबत गारपिटीची नोंद झाली. या अनपेक्षित बदलामुळे शहरातील जनजीवन काही काळ विस्कळीत झाले. सिंहगड रस्त्यावरील नवश्या मारुती मंदिराजवळ पिंपळाचे मोठे झाड कोसळून साठ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
पावसाच्या जोरदार सरींमुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले. सिंहगड रस्ता, मणिकबाग, कोंढवा बुद्रुक, धानोरी, बालाजीनगर आदी भागांत रस्त्यांवरून पाण्याचे प्रवाह वाहताना दिसले. काही ठिकाणी वाहनं पाण्यात अडकून पडली, तर वाहनचालकांना दिवे लावूनच मार्ग काढावा लागला. उन्हाळ्याचा काळ असल्याने नागरिक छत्री किंवा पावसाळी साहित्याशिवाय बाहेर पडले होते. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. सुमारे तासभर सुरू असलेल्या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. पिंपरी-चिंचवड परिसरातही अशाच स्वरूपाचा पाऊस पडून अनेक ठिकाणी पाणी साचल्याचे दिसून आले.
दरम्यान, या अवकाळी पावसाचा परिणाम ग्रामीण भागातही जाणवला. जिल्ह्यातील काही भागांत गारपिटीमुळे शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. विशेषतः मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हनुमान जयंतीच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या उत्सवातही पावसाने व्यत्यय आणला. काही मंदिर परिसर आणि मंडपांत पाणी साचल्याने भाविकांची गैरसोय झाली. मात्र, या पावसामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

COMMENTS