Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले तालुक्यात गारपीट; शेतीचे नुकसान

 अकोले : तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भर उन्हाळ्यात अचानक पडलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्यावर संकट ओढवले आहे.  तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू, मका तसेच कोथिंबीर या पिकांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी गव्हाची कापणी व कांद्याची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.  आधीच शेतीमालाला समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत असताना या अवकाळी पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. काढलेला गहू व कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पिके झाकण्याची धडपड केली. तसेच वीटभट्टी व्यवसायिकांनीही महागड्या ताडपत्री व प्लास्टिकचा वापर करून विटा झाकण्याचा प्रयत्न केला; मात्र ओल्या मातीच्या विटांचेही मोठे नुकसान झाले.  या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी सयाजीराव पोखरकर यांनी केली आहे. 

तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा; अकोले दिव्यांग क्रांती संघटनेची मागणी
शरद पवारांच्या योगदानामुळे ‘रयत’ची उंची वाढली : शिंदे  
‘सकल ओबीसी समाज’ आणि ‘समता परिषदे’तर्फे गुणवंतांचा शाही सत्कार

 अकोले : तालुक्यात सोमवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसासह गारपिटीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भर उन्हाळ्यात अचानक पडलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्यावर संकट ओढवले आहे.

 तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या गारपिटीमुळे काढणीला आलेल्या कांदा, गहू, मका तसेच कोथिंबीर या पिकांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी गव्हाची कापणी व कांद्याची काढणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

 आधीच शेतीमालाला समाधानकारक दर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत असताना या अवकाळी पावसामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. काढलेला गहू व कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पिके झाकण्याची धडपड केली. तसेच वीटभट्टी व्यवसायिकांनीही महागड्या ताडपत्री व प्लास्टिकचा वापर करून विटा झाकण्याचा प्रयत्न केला; मात्र ओल्या मातीच्या विटांचेही मोठे नुकसान झाले.

 या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी कृषिभूषण पुरस्कारप्राप्त शेतकरी सयाजीराव पोखरकर यांनी केली आहे. 

COMMENTS