Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुरतमध्ये लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू

गांधीनगर : गुजरातमधील सुरत येथे भीषण आग लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे. लिंब

पानंद रस्ता जेसीबीने उखडला; नागरिक संतप्त
2022 सुरू होण्यापूर्वी शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवणार -शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील
कॅन्सर रुग्णांच्या सेवेसाठी टाटा-एसएमबीटी हॉस्पिटल एकत्र – महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात

गांधीनगर : गुजरातमधील सुरत येथे भीषण आग लागून एका कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी समोर आली आहे. लिंबायत परिसरातील मीठी खाडी जवळील निवासी इमारतीत ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इमारतीतील एका घरात अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या आगीत एक लहान मुलासह पाच जण गंभीररीत्या भाजले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने अल्पावधीत आगीवर नियंत्रण मिळवले आणि जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये शाहनाज बेगम अब्दुल कलाम अन्सारी (65), हुशा बेगम अब्दुल कलाम अन्सारी (18), शुभान रमजान अली अन्सारी (4), शबीना रमजान अली अन्सारी (28) आणि परवीन अब्दुल कलाम अन्सारी (19) यांचा समावेश आहे. एकाच कुटुंबातील सर्व सदस्य गमावल्याने स्थानिक पातळीवर हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS