Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वसंतदादा पाटील महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर वेबिनार संपन्न

पाटोदा प्रतिनिधी - येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 26 जुलै रोजी ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 20

वसंतदादा पाटील महाविद्यालयात घेतली अवयवदान प्रतिज्ञा
वसंतदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
वसंतदादा पाटील महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

पाटोदा प्रतिनिधी – येथील नवगण शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 26 जुलै रोजी ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020:आव्हाने व संधी’ या विषयावर वेबिनार उत्साहात संपन्न झाला.
महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे होते. साधनव्यक्ती म्हणून वाळूज, छत्रपती संभाजीनगरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्राजक्ती भोसले-वाघ होत्या. साधनव्यक्तीचा परिचय लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. पल्लवी इरलापल्ले यांनी करून दिला. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. प्राजक्ती भोसले-वाघ यांनी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्ट्ये, शिक्षणपद्धतीचे प्रकार तसेच शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करताना येणारी आव्हाने व घडू पाहणारे बदल याविषयी सविस्तर विश्लेषण केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांनी केला. आभारप्रदर्शन  अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक  डॉ. मनोजकुमार प्रकाश यांनी केला. या वेबिनारचा लाभ कनिष्ठ, पदवी व पदव्युत्तर विभागाचे विद्यार्थी तसेच प्राध्यापकांनी घेतला. प्राचार्य प्रोफेसर आबासाहेब हांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या वेबिनारच्या यशस्वितेसाठी संगणकशास्त्र विभागाचे प्रा. अमोल भालेराव, प्रा. मुख्तारखान पठाण, प्रा. बालाजी घोडके यांचे तंत्रसहाय्य लाभले.

COMMENTS