किनवट : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने सध्या संपूर्ण राज्यभरात मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण आणि ’एसआयआर’ (एसआयआर) अभियान अत्यंत

किनवट : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने सध्या संपूर्ण राज्यभरात मतदार याद्यांचे पुनर्निरीक्षण आणि ’एसआयआर’ (एसआयआर) अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवले जात आहे. या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि संघटनात्मक मांडणी अधिक मजबूत करण्यासाठी, बाबुराव (तुळसिराम) दिगांबर केंद्रे यांची किनवट (83) विधानसभा प्रमुख ( बिएलए 1) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अधिकृत पत्राद्वारे या नियुक्तीची घोषणा केली असून, या निवडीमुळे किनवट विधानसभा मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बाबुराव केंद्रे यांचा जनसंपर्क आणि भाजपमधील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, प्रदेश नेतृत्वााने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी काळातील निवडणुकांचे गणित आणि मतदार याद्यांमधील पारदर्शकता या दृष्टीने ’बीएलए 1’ हे पद अत्यंत कळीचे मानले जाते. नवनियुक्त विधानसभा प्रमुख म्हणून बाबुराव केंद्रे यांच्यावर मतदार यादी शुद्धीकरण: विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्यांची सूक्ष्म पातळीवर अचूकता तपासणे आणि पुनर्निरीक्षण प्रक्रियेला गती देणे. बूथ स्तरावर नियुक्त्या: स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकार्यांशी समन्वय साधून प्रत्येक मतदान केंद्रावर (बूथवर) ’बीएलए 2’ च्या नियुक्त्या तातडीने पूर्ण करणे.डिजिटल समन्वय: नियुक्त केलेल्या सर्व कार्यकर्त्यांची अद्ययावत माहिती प्रदेश कार्यालयाला ई-मेल आणि व्हॉट्सपच्या माध्यमातून तत्काळ उपलब्ध करून देणे. अशा प्रमुख जबाबदार्यांचे शिवधनुष्य असेल. बाबुराव केंद्रे यांच्या नियुक्तीमुळे मतदार नोंदणी आणि यादीतील त्रुटी दूर करण्याचे काम अत्यंत पारदर्शकपणे पार पडेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मतदारसंघातील आ.भिमराव केराम यांच्यासह भाजप पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे उत्स्फूर्त स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. किनवटच्या राजकीय वर्तुळात या नियुक्तीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

COMMENTS