Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तामसात एचपी पेट्रोलपंप बंद; कृत्रिम टंचाईमुळे नागरिक व शेतकरी त्रस्त

तामसा : सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या कृत्रिम टंचाईची चर्चा सुरू असताना तामसा येथेही त्याचे ती

Nanded : सरकारच्या जीआरची होळी करत रयत क्रांती संघटनेचे आंदोलन | LokNews24
मुदखेड मतदारसंघातील अनियमिततेवर अंदाज समितीची झडती; पोषण आहार व वाळू उपशावर गंभीर प्रश्नचिन्ह
जात पडताळणी टाळून 25 वर्षांची नोकरी; डांगे प्रकरणात वरिष्ठांचा ‘मूक आशीर्वाद’?

तामसा : सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभरात पेट्रोल, डिझेल व गॅसच्या कृत्रिम टंचाईची चर्चा सुरू असताना तामसा येथेही त्याचे तीव्र परिणाम दिसून येत आहेत. येथील एचपी (कझ) पेट्रोलपंप मागील काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तामसा परिसरातील एचपी पेट्रोलपंप बंद असल्यामुळे सर्व वाहनधारकांचा ओघ नायरा पेट्रोल पंपाकडे वळला असून तेथे प्रचंड गर्दी होत आहे. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वेळेचा अपव्यय आणि गैरसोय वाढली आहे. दरम्यान, शासनाच्या नियमानुसार कोणताही पेट्रोलपंप बंद ठेवताना त्याचे कारण संबंधित पुरवठा विभागाला कळविणे बंधनकारक असताना तामसा येथील एचपी पंपाबाबत अशी कोणतीही स्पष्ट नोंद नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. पेट्रोल व डिझेल ही आजच्या काळातील अत्यावश्यक गरज बनली असून विशेषतः शेतकर्‍यांसाठी डिझेलचे महत्त्व अधिक आहे. सध्या हळद, गहू, हरभरा काढणीचा हंगाम सुरू असल्याने ट्रॅक्टर, हॉलर व अन्य यंत्रांसाठी डिझेलची गरज मोठ्या प्रमाणात भासत आहे. मात्र कृत्रिम टंचाईमुळे शेतकर्‍यांची मोठी हेळसांड होत आहे. शासनाच्या नियमांनुसार कॅन किंवा बाटलीत डिझेल देण्यावर निर्बंध असल्याने शेतकर्‍यांना शेतात डिझेल पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतीकामांवरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, एचपी पेट्रोलपंप बंद का आहे याबाबत विचारणा केली असता संबंधितांकडून ‘क्रेडिट व फायनान्स’ कारण पुढे करण्यात आले. मात्र याबाबत अधिकृत स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. यावर उपाय म्हणून शेतकर्‍यांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजप महिला तालुका अध्यक्षा ममता जोशी यांनी केली आहे. तसेच प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून पेट्रोल-डिझेल पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS