जामखेड : येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कॅश (रोख) उपलब्ध नाही. आधिकारी कर्मऱ्यांची उद्धट भाषा यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे व संतापाचे वा

जामखेड : येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये कॅश (रोख) उपलब्ध नाही. आधिकारी कर्मऱ्यांची उद्धट भाषा यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजीचे व संतापाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे येथील नागरिक सांगतात. विशेषतः महिला शेतकरी व सोसायटीचे कर्ज व्यवहार करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बँकेत पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना “कॅश उपलब्ध नाही” असे सांगण्यात येत असल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी बँक व्यवस्थापनाकडे नाराजी व्यक्त केली. कर्जाचे हप्ते, शेतीची कामे तसेच दैनंदिन खर्चासाठी पैसे आवश्यक असताना रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढला आहे.याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांना विचारणा केली असता, “सध्या कॅश उपलब्ध नाही. सोमवारी कॅश येईल का, याबाबत निश्चित सांगता येत नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.दरम्यान, कॅश टंचाईची समस्या लवकरात लवकर सोडवावी, अशी मागणी बँकेच्या ग्राहकांमधून होत आहे.

COMMENTS