सिरसाळा : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊनही गेल्या अनेक दिवसांपासून हप्ते रखडल्यामुळे अडचणीत सापडलेल्या सिरसाळा येथील लाभार्थ्यांना

सिरसाळा : पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर होऊनही गेल्या अनेक दिवसांपासून हप्ते रखडल्यामुळे अडचणीत सापडलेल्या सिरसाळा येथील लाभार्थ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे कृषीमंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार धनंजय मुंडे यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे हे थकीत हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. याबद्दल सरपंच सोहेल पठाण व ग्रामस्थांनी मुंडे साहेबांचे आभार मानले आहेत.
सिरसाळा येथील अनेक गोरगरीब लाभार्थ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. घरकुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लाभार्थ्यांनी कामाला सुरुवात केली, मात्र मधल्या काळात शासनाकडून मिळणारे हप्ते अचानक रखडले. घराचे बांधकाम अर्धवट राहू नये यासाठी अनेक लाभार्थ्यांनी खासगी सावकारांकडून किंवा ओळखीच्या लोकांकडून व्याजाने पैसे काढून घराचे काम पूर्ण केले होते. मात्र, हप्ते मिळत नसल्याने घेतलेले पैसे परत कसे करायचे, या विवंचनेत लाभार्थी होते. लाभार्थ्यांनी आपली ही व्यथा ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांसमोर मांडली. तत्कालीन सरपंच प्रतिनिधी फिरोज पठाण, माजी सरपंच अक्रम खान पठाण,ग्रा.प. सदस्य शेख नदीम भाई, ग्रा.प. सदस्य नेहाल भाई मणियार, यांनी तातडीने हा प्रश्न आमदार धनंजय मुंडे यांच्या कानावर घातला.धनंजय मुंडे यांनी संबंधित विभागाकडे तात्काळ पाठपुरावा करून तांत्रिक अडचणी दूर केल्या आणि रखडलेले हप्ते त्वरित वितरित करण्याचे आदेश दिले. लाभार्थ्यांनी व्यक्त केला आनंद हप्ते जमा झाल्यामुळे आता लाभार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. रखडलेले हप्ते मिळाल्याने व्याजाचे पैसे परत करणे शक्य झाले असून, हक्काचे घर पूर्ण होत असल्याचा आनंद लाभार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत आहे.
आमदार धनंजय मुंडे साहेब नेहमीच सामान्यांच्या प्रश्नावर तत्पर असतात. सिरसाळ्यातील घरकुल धारकांचे प्रश्न त्यांनी गांभीर्याने सोडवले, त्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो.

COMMENTS