Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये जागतिक क्षयरोग दिन उत्साहात साजरा

बीड : जागतिक क्षयरोग दिन निमित्त राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्हा बीडमध्ये विविध जनजागृती उपक्रम राबवून हा दिवस उत्साहात साजरा

आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश; सिरसाळा येथील घरकुल धारकांचे थकीत हप्ते खात्यावर जमा!
दिव्यांग बांधवांसाठी मदतीचा हात; कोहिणी-पाटण ग्रामपंचायतीकडून निधी वितरण
ट्रान्सजेंडर विधेयकाविरोधात बीडमध्ये विविध संघटनांचा निषेध; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बीड : जागतिक क्षयरोग दिन निमित्त राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत जिल्हा बीडमध्ये विविध जनजागृती उपक्रम राबवून हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 24 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता बीड शहरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्लास गंडाळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम, निवासी बाह्यरुग्ण वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीकांत तांदळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेशकुमार माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. सौ. मनीषा जाधव तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून प्रारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे समारोप करण्यात आली. रॅलीमध्ये शासकीय व खाजगी नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विविध शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समारोप प्रसंगी क्षयरोगाचे जनक रॉबर्ट कोच यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व क्षयरोग निर्मूलनाची शपथ घेण्यात आली. यावेळी णपर्ळींशीीरश्र थशश्रषरीश रपव डेलळरश्र ठशषेीा र्ऋेीपवरींळेप, बीड यांच्या वतीने 10 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. 2026 चे घोषवाक्य होय! आपण क्षयरोगाचा अंत करू शकतो नेतृत्वाच्या बळावर व समुदायाच्या सहभागावर निश्चित संपवू शकतो. क्षयरोगाबाबत माहिती क्षयरोग हा क्षयरोग (ढइ) हा चूलेलरलींशीर्ळीा र्ीींलशीर्लीश्रेीळी या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. 1882 साली रॉबर्ट कोच यांनी या जीवाणूचा शोध लावला. हा रोग मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, मात्र शरीरातील इतर अवयवांनाही बाधित करू शकतो. कारणे व प्रसार खोकला व शिंकांमधून हवेद्वारे संसर्ग गर्दी व अस्वच्छ वातावरणात प्रसार अधिक रुग्णाच्या संपर्कातून संक्रमण लक्षणे: दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला सतत ताप येणे, छातीत दुखणे वजन कमी होणे  जिल्हा स्थिती (2025) जिल्ह्यात एकूण 1998 क्षयरुग्णांचे निदान झाले असून त्यापैकी 1189 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. उर्वरित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियान अंतर्गत 24 मार्च 2026 ते 01 जुलै 2026 या कालावधीत जिल्ह्यातील 344 गावांमध्ये 100 दिवसांची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये क्षयरोगाबाबत जनजागृती वाढण्यास मदत होणार असून, टीबी मुक्त बीड या उद्दिष्टाच्या दिशेने जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

COMMENTS