Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रयत बँकेकडून गुणवंत पाल्यांचा सत्कार

कोपरगाव : रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक शाखा कोपरगाव यांच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. एसएसजीएम महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला सभासद, पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रयत सेवक बँकेचे शाखा समिती चेअरमन दीपक भोये यांच्या प्रास्ताविकाने झाली. सदर कार्यक्रमासाठी आ. सत्यजित तांबे प्रमुख पाहुणे होते. आ.तांबेंच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी, पालक व सभासद यांमध्ये नव उमेद, आत्मविश्वास व ध्येयप्राप्तीची जिद्द निर्माण झाली. व्यक्तिमत्वातील साधेपणा, दूरदृष्टी, व समाजहिताची बांधिलकी यांचे जिवंत दर्शन या कार्यक्रमातून घडले. यावेळी नंदकिशोर गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात कोपरगाव कार्यक्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे असे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अल्प व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी बँकेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  कार्यक्रमामध्ये पद्माकांत कुदळे, कारभारी वेलजाळी, रमेश  शिंदे, तसेच एसएसजीएम महाविद्यालयाचे   प्राचार्य माधव सरोदे या सर्वांनी आपल्या मनोगता मध्ये विद्यार्थ्यांची यशप्राप्तीसाठी त्यांचा गुणगौरव करून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत या सन्मानामुळे पुढील वाटचालीसाठी मोठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रविंद्र हिंगे यांनी केले. सिताराम झुराळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्विकृत संचालक भिमा लेंभे, सभासद प्रतिनिधी सुनील गोसावी, कोपरगाव बँक शाखाप्रमुख प्रविण ननवरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेवगाव तालुक्यातील नागलवाडीमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा; शस्त्रांचा धाक; 55 तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज लंपास
जीवघेण्या हल्ल्यांतील आरोपी २४ तासांत जेरबंद; परस्परविरोधी गुन्ह्यांत शेवगाव पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपींना अटक
घरगुती गॅससाठी ‘ई-केवायसी’ बंधनकारक; प्रक्रिया न केल्यास अनुदान थांबण्याची शक्यता

कोपरगाव : रयत सेवक को-ऑपरेटिव्ह बँक शाखा कोपरगाव यांच्या वतीने सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. एसएसजीएम महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमाला सभासद, पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात रयत सेवक बँकेचे शाखा समिती चेअरमन दीपक भोये यांच्या प्रास्ताविकाने झाली.

सदर कार्यक्रमासाठी आ. सत्यजित तांबे प्रमुख पाहुणे होते. आ.तांबेंच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी, पालक व सभासद यांमध्ये नव उमेद, आत्मविश्वास व ध्येयप्राप्तीची जिद्द निर्माण झाली. व्यक्तिमत्वातील साधेपणा, दूरदृष्टी, व समाजहिताची बांधिलकी यांचे जिवंत दर्शन या कार्यक्रमातून घडले.

यावेळी नंदकिशोर गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात कोपरगाव कार्यक्षेत्रातील अनेक विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे असे सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अल्प व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्याची तयारी बँकेची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 कार्यक्रमामध्ये पद्माकांत कुदळे, कारभारी वेलजाळी, रमेश  शिंदे, तसेच एसएसजीएम महाविद्यालयाचे   प्राचार्य माधव सरोदे या सर्वांनी आपल्या मनोगता मध्ये विद्यार्थ्यांची यशप्राप्तीसाठी त्यांचा गुणगौरव करून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत या सन्मानामुळे पुढील वाटचालीसाठी मोठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रविंद्र हिंगे यांनी केले. सिताराम झुराळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्विकृत संचालक भिमा लेंभे, सभासद प्रतिनिधी सुनील गोसावी, कोपरगाव बँक शाखाप्रमुख प्रविण ननवरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS