मुंबई : राज्यात नव वर्षांच्या पहिल्याच दिवशी ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी वेग धरला आहे. याला निमित्त ठरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजधानी दि

मुंबई : राज्यात नव वर्षांच्या पहिल्याच दिवशी ऑपरेशन टायगरच्या चर्चांनी वेग धरला आहे. याला निमित्त ठरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजधानी दिल्लीतील दौरा. या दौर्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर ठाकरे गटाचे चार खासदार लवकरच शिंदे गटासोबत जाणार असल्याच्या चर्चांना वेग धरला आहे.
खा. संजय राऊत यांनी गुरूवारी सामाजिक माध्यमावर एक जुना व्हिडिओ शेअर करत अप्रत्यक्ष राजकीय इशारा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी पक्ष सोडणार्यांवर कठोर भूमिका व्यक्त करताना दिसतात.खा. राऊत यांनी या व्हिडिओसोबत कहाणी अच्छी है! असा सूचक संदेश दिल्याने त्यामागील राजकीय अर्थाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. विशेष म्हणजे, नववर्षाच्या शुभेच्छांच्या वातावरणात अशा प्रकारचा संदेश दिल्यामुळे हा केवळ योगायोग नसून ठरवून दिलेला संकेत असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. राज्यात सध्या पक्षांतराच्या शक्यतांबाबत कुजबुज सुरू आहे. काही नेते आपली राजकीय भूमिका बदलण्याच्या विचारात असल्याची चर्चा रंगली आहे. अशा पार्श्वभूमीवर राऊत यांचा व्हिडिओ हा संभाव्य बंडखोरांना इशारा असल्याचे मानले जात आहे. राजकारणात संदेश थेट दिला जात नाही; तो सूचक पद्धतीने पोहोचवला जातो, हे यामधून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. राज्याच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’ या नावाने एक संभाव्य राजकीय हालचाल चर्चेत आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिल्ली दौर्यात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपल्या गटातील खासदारांशीही चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही खासदार शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चार खासदार पक्षांतर करू शकतात, अशी चर्चा रंगली आहे. जर ही शक्यता प्रत्यक्षात आली, तर दिल्लीतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो. शिंदे गटाची ताकद वाढेल, तर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो. त्यामुळेच राऊत यांचा इशारा हा संभाव्य फुटीला रोखण्याचा प्रयत्न असल्याचेही मानले जात आहे. एकूणच, नववर्षाच्या प्रारंभीच राज्याच्या राजकारणात अस्थिरतेची चिन्हे दिसू लागली आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ ही केवळ अफवा आहे की नियोजित राजकीय रणनीती, याचे उत्तर येत्या काळात स्पष्ट होईल. राऊत यांनी शेअर केलेला व्हिडिओ हा फक्त योगायोग आहे की मोठ्या राजकीय हालचालीचा भाग, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, या घटनेमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS